भारताने पहिला सामना सहज जिंकल्यानंतर यजमान संघ दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात भारताचा आठ गडी राखून सहज पराभव करीत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आज तिसरा एकदिवसीय आणि मालिकेतील अंतिम सामना रंगणार आहे. हा निर्णायक सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी दोन्ही संघाला असून यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारताने १९९१-९२ पासून आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यास सुरुवात केली आहे, परंतु २०१८ मध्ये केवळ एकदाच या देशाच्या भूमीवर भारताला मालिका जिंकण्यात यश आले आहे. यावेळी भारताला दुसऱ्यांदा मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे, मात्र त्यासाठी सलामीच्या जोडीकडून चांगली सुरुवात करावी लागेल. ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन ही जोडी चांगली सुरुवात करण्यात यशस्वी ठरलेली नाही. सुदर्शनने ५५ आणि ६२ धावांची इनिंग नक्कीच खेळली आहे, पण गायकवाडची बॅट चालली नाही, त्याने फक्त पाच आणि चार धावांची इनिंग खेळली आहे.
मुकेश कुमारलाही लय मिळालेलं नाही-
गोलंदाजीत मुकेश कुमारने गेल्या दोन सामन्यांत एकही विकेट न घेणे ही चिंतेची बाब आहे. अर्शदीप आणि आवेश खान यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात नऊ विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला, परंतु मुकेशला दोन्ही सामन्यात सहज धावा मिळाल्या. भारताच्या विजयासाठी मुकेशला लयीत येणे महत्त्वाचे आहे.
चहल संधी मिळणार?
अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलचे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले असले तरी पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला संधी देण्यात आली नाही. राहुलने कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तिसऱ्या सामन्यात त्याला खेळवले जाण्याची शक्यता आहे. तो खेळला नाही तर त्याचा दौरा एकाही सामन्याशिवाय संपेल. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये हरियाणासाठी चमकदार कामगिरी केली आहे.
जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, टोनी डी जॉर्जी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.
भारत: रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.