Mohsin Naqvi on Champions Trophy 2025 : पाकिस्तानात होणार असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार का याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाणार आहे. टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नसल्याची बाब लक्षात घेऊन ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्येच खेळवली जाईल, अशी अपेक्षा आहे. एकूणच भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील असे अपेक्षित आहे. मात्र, आयसीसीची स्पर्धा आपल्या देशात होत असल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तयारीला सुरुवात केली आहे.
पीसीबीने कराची, लाहोर आणि रावळपिंडी या मैदानाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे वारंवार भारतीय संघ पाकिस्तानात येईलच असे सांगत असतात. भारतासह सर्व संघ पाकिस्तान दौऱ्यावर येतील, असा विश्वास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला. भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावासोबतच क्रिकेट संबंधांमध्येही चढउतार पाहायला मिळत आहेत. भारतीय संघाने २००८ पासून पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळलेला नाही, तर पाकिस्तान संघाने २०१६ ट्वेंटी-२० विश्वचषक आणि २०२३ वन डे विश्वचषक यावेळी भारताचा दौरा केला आहे.
यापूर्वी आशिया चषक २०२३ मध्ये देखील पाकिस्तानने स्पर्धेचे आयोजन केले होते, परंतु ही स्पर्धा देखील हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली गेली होती. आशिया चषकाचे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत झाले. अशा परिस्थितीत हायब्रीड मॉडेलच्या आधारे चॅम्पियन्स ट्रॉफीही आयोजित केली जाऊ शकते. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी रविवारी लाहोरमधील स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, भारतीय संघ पाकिस्तानात येईल अशी आम्हाला आशा आहे... आतापर्यंत अशी कोणतीच घटना घडली नाही, जे कारण सांगून ते विरोध करतील. त्यामुळे सर्वच संघ इथे येतील असा विश्वास आहे.
Web Title: The thrill of the Champions Trophy in Pakistan Team India will also come PCB said the reason
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.