नवी दिल्ली : पाकिस्तानी संघ इंग्लंडविरूद्ध मायदेशात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडनेपाकिस्तानचा 74 धावांनी पराभव केला. पाकिस्तान संघ त्यांच्या 2 सर्वोत्तम गोलंदाजांशिवाय ही मालिका खेळत आहे. स्टार गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहेत. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहीन सांगत आहे की, मला दुखापत झाली नाही, तर नजर लागली आहे.
"आम्ही अनफिट नाही आम्हाला नजर लागले"पाकिस्तानातील एका स्थानिक पत्रकाराने ट्विटरवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शाहिन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ सोबत बसल्याचे पाहायला मिळत आहे. शाहिन व्हिडीओमध्ये म्हणतो की, "आम्ही अनफिट नाही आहोत, तर आम्हाला नजर लागली आहे. असे काही नाही. आम्ही दोघे लवकरच मैदानावर दिसणार आहोत. पूर्णपणे फिट होऊन."
खरं तर शाहिन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ फिट होण्यासाठी उपचार घेत आहेत, त्यामुळे त्यांना इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शाहिनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून शाहिन पाकिस्तानी संघातून बाहेर आहे.
हॅरिस रौफ पण झाला बाहेर हॅरिस रौफने अलीकडेच पाकिस्तानी संघात पदार्पण केले आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात गोलंदाजी करत 13 षटके टाकली. यादरम्यान त्याने 1 बळी घेतला आणि 78 धावा दिल्या. दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजी केली नसली तरी. दुसऱ्या डावात तो फलंदाजीसाठी आला पण शून्यावर बाद झाला. मात्र तो आता या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"