Asia Cup 2023 - दोन दिवसावर आशिया चषक स्पर्धा येऊन ठेपली आणि सर्वांना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान लढतीची... पाकिस्तानकडे यजमानपद गेल्यापासून ही चर्चा चर्चेत आली आहे. त्यात BCCI ने कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याची भूमिका घेतल्याने स्पर्धाच अडचणीत येते की काय असे चिन्ह दिसू लागले. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, आशियाई क्रिकेट संघटना अन् BCCI सह अन्य बोर्डांच्या बैठकींवर बैठकी झाल्या अन् अखेर हायब्रिड मॉडेलनुसार आशिया चषक खेळवण्याचा निर्णय झाला. पाकिस्तानात ४ सामने होतील, तर उर्वरित ९ सामने श्रीलंकेत घेण्याचे ठरले. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील आणि २ सप्टेबंरला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच आहे.
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेतही १४ ऑक्टोबरला IND vs PAK लढत होणार आहे. त्याआधी आशिया चषक स्पर्धेत किमान ३ वेळा हे तगडे संघ भिडतील. त्यामुळेच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, २ सप्टेंबरला होणाऱ्या लढतीबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत आणि चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता अधिक आहे. बाबर आजमच्या संघाने नुकतेच अफगाणिस्तानला ३-० असे नमवून वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे आणि त्यांचे मनोबल उंचावलेले आहे. भारतीय संघ लोकेश राहुल, श्रेयस अय्यर व जसप्रीत बुमराह यांच्या पुनरागमनामुळे पुन्हा बलाढ्य झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघांची ठसन पाहण्यासाठी सारेच आतुर आहेत.
पण, या सामन्यावर पावसाचे संकट घोंगावतेय... २ सप्टेंबरला कँडी येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे आणि धो धो पाऊस पडण्याची शक्यता ही ४० ते ६० टक्के इतकी आहे. त्यामुळे India vs Pakistan लढतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतीय संघ सध्या बंगळुरू येथे ६ दिवसीय शिबिरासाठी दाखल झाला आहे आणि ३० ऑगस्टला ते कोलम्बोसाठी रवाना होतील.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किसन, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.
पाकिस्तानचा संघ - बाबर आजम, शादाब खान, मोहम्मद रिझवान, फखर जमान, अब्दुल्लाह शफिक, इमाम-उल-हक, सौद शकील, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसमा मीर, हॅरीस रौफ, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, तय्यब ताहीर, मोहम्मद हॅरिस, फहिम अश्रफ, मोहम्मद वासीम
Web Title: The weather forecast for 2nd September predicts heavy showers at Balagolla, Sri Lanka which can result in rain spoiling much awaited IND vs PAK clash in Asia Cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.