Ranji Trophy 2022 : पश्चिम बंगालच्या क्रीडा मंत्र्याची कमाल, रणजी करंडक स्पर्धेत शतकी खेळी, पहिल्या डावातही केलेल्या ७३ धावा

Ranji Trophy 2022 : बंगालच्या संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 01:29 PM2022-06-10T13:29:06+5:302022-06-10T13:30:14+5:30

whatsapp join usJoin us
The West Bengal Sports Minister Manoj Tiwary scored 100 runs in 152 balls  (14x4, 1x6) Bengal 236/5, has now scored a fifty in each innings in the Ranji Trophy quarterfinal  | Ranji Trophy 2022 : पश्चिम बंगालच्या क्रीडा मंत्र्याची कमाल, रणजी करंडक स्पर्धेत शतकी खेळी, पहिल्या डावातही केलेल्या ७३ धावा

Ranji Trophy 2022 : पश्चिम बंगालच्या क्रीडा मंत्र्याची कमाल, रणजी करंडक स्पर्धेत शतकी खेळी, पहिल्या डावातही केलेल्या ७३ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ranji Trophy 2022 : बंगालच्या संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. झारखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बंगालने पाचव्या दिवशी ७१२ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. बंगालच्या दुसऱ्या डावात भारताचा फलंदाज व पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी ( West Bengal Sports Minister Manoj Tiwary ) याने शतकी खेळी करून बंगालच्या धावसंख्येत अधिकची भर घातली. 

बंगालने पहिला डाव ७  बाद ७७३ धावांवर घोषित केला. सुदीप घरमी ( १८६) आणि अनुस्तूप मजुमदार ( ११७) यांच्या शतकी खेळीसोबत अभिषेक रमन ( ६१), कर्णधार अभिमन्यू ईश्वरन ( ६५), मनोज तिवारी ( ७३), अभिषेक पोरेल (६८), शाहबाज अहमद ( ७८), सयान मोडल ( ५३*) व आकाश दीप (  ५३*) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगालने हा डोंगर उभा केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रथमच एका डावात ९ फलंदाजांनी ५०+ धावा करण्याचा प्रसंग या सामन्यातून घडला. त्यानंतर झारखंडचा पहिला डाव २९८ धावांवर गडगडला. विराट सिंगने ११३ धावांची खेळी केली, तर नजिम सिद्दीकीने ५३ धावा केल्या. शाहबाज अहमद व सयान मोडल यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

बंगालच्या दुसऱ्या डावात आघाडीचे पाच फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मनोज तिवारी व अनुस्तूप यांनी डाव सावरला. अनुस्तूपने ३८ धावा केल्या. अभिषेक पोरेलने ३४ धावा केल्या. मनोज १७९ चेंडूंत १८ चौकार व २ षटकारांसह १३१ धावांवर, तर शाहबाज ३५ धावांवर खेळत आहेत. बंगालने ५ बाद २८९ धावा करताना ७६४ धावांची आघाडी घेतली आहे. 

Web Title: The West Bengal Sports Minister Manoj Tiwary scored 100 runs in 152 balls  (14x4, 1x6) Bengal 236/5, has now scored a fifty in each innings in the Ranji Trophy quarterfinal 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.