महिलेकडून उच्च शिक्षणाच्या नावे विद्यार्थ्याला चुना, लाखो रुपये उकळले

मुंबईतील अंबोली पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडला.

By गौरी टेंबकर | Published: May 15, 2024 03:41 PM2024-05-15T15:41:20+5:302024-05-15T15:41:32+5:30

whatsapp join usJoin us
The woman extorted lakhs of rupees from the student for the sake of higher education | महिलेकडून उच्च शिक्षणाच्या नावे विद्यार्थ्याला चुना, लाखो रुपये उकळले

महिलेकडून उच्च शिक्षणाच्या नावे विद्यार्थ्याला चुना, लाखो रुपये उकळले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचे आमिश दाखवत एका महिलेने लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार अंबोली पोलिसांच्या हद्दीत घडला. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

तक्रारदार कमलेश कुमार कोठारी यांनी याप्रकरणी आंबोली पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २३ मे २०२३ ते अद्याप पर्यंत विना आंबेकर नावाचा महिलेने कोठारी यांच्याकडून १ लाख ४५ हजार रुपये उकळले. आंबेकरने कोठारी यांच्या मुलाला मुंबई ते टोरंटो येथे उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या निमित्ताने विमान तिकीट बुकिंग आणि मनी एक्सचेंजसाठी आगाऊ रक्कम आकारली.

मात्र त्यांना विमानासाठी तिकीट उपलब्ध करून दिलेच नाही. तसेच कॅनडियन डॉलर ॲक्शन साठी दिलेले पैसे ही परत न करता त्यांना लाखोंचा चुना लावला. याप्रकरणी कोठारी यांनी तक्रार दिल्यावर अंबोली पोलिसांनी आंबेकर विरोधात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६ व ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Web Title: The woman extorted lakhs of rupees from the student for the sake of higher education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.