'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)

Team India enjoying return journey in Plane: भारताच्या खेळाडूंनी मायदेशात परत येत असताना विमानात फुल ऑन मज्जा-मस्ती केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 02:08 PM2024-07-04T14:08:45+5:302024-07-04T14:26:19+5:30

whatsapp join usJoin us
The 'World Champions' are back Team India enjoyed return journey to India fun loving Rohit Sharma Virat Kohli watch video VIDEO | 'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)

'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India enjoying return journey in Plane: भारतीय संघाने तब्बल १३ वर्षांनी वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाने टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी संयमी कामगिरी करत सात धावांनी विजय मिळवला आणि १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० विश्वचषकाची ट्रॉफी मायदेशी आणली. भारतीय संघ आज ही ट्रॉफी घेऊन भारतात दाखल झाला. भारतीय संघ बार्बाडोसमध्ये जिंकला पण त्यानंतर तीन दिवस संघाला चक्रीवादळाच्या भीतीमुळे थांबावे लागले होते. अखेर एअर इंडियाच्या विशेष विमानाने त्यांना मायदेशी आणण्यात आले. या परतीच्या प्रवासादरम्यान टीम इंडियाने तुफान धमाल केली.

भारतीय संघाने परतीच्या प्रवासात तुफान धम्माल केली. संघाचे नेतृत्व करणारा आणि मैदानावर परिपक्वता दाखवणारा रोहित शर्मा लहान मुलांसारखे वेडीवाकडे हावभाव करून मज्जा करताना दिसला. सूर्यकुमार यादवही त्याला साथ देताना दिला. विराट कोहलीपासून ते अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज साऱ्यांनी वर्ल्डकपच्या ट्रॉफीसोबत मनसोक्त फोटोशूट केले. रिषभ पंतदेखील ट्रॉफी हाती घेऊन जल्लोष करत असल्याचे दिसले. अक्षर पटेल आणि इतर युवा खेळाडूंनीही संघ सहकाऱ्यांसोबत तुफान मजा-मस्ती केली.

Web Title: The 'World Champions' are back Team India enjoyed return journey to India fun loving Rohit Sharma Virat Kohli watch video VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.