जगातल्या नंबर 1 बॉलरला WTC फायनलमध्ये वगळले, त्यानेच भारतात येऊन दोन बळी घेतले

रोहित शर्मा आणि राहुल द्रविडच्या या निर्णयावर टीकाही झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 09:58 AM2023-06-15T09:58:38+5:302023-06-15T09:59:02+5:30

whatsapp join usJoin us
The World No. 1 bowler was dropped in the WTC final by Team India, R Ashwin came to India and took two wickets | जगातल्या नंबर 1 बॉलरला WTC फायनलमध्ये वगळले, त्यानेच भारतात येऊन दोन बळी घेतले

जगातल्या नंबर 1 बॉलरला WTC फायनलमध्ये वगळले, त्यानेच भारतात येऊन दोन बळी घेतले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गेल्याच आठवड्यात आयसीसी टेस्ट वर्ल्डकप फायनल झाली. भारताने सर्वात मोठी चूक केली ती म्हणजे आर आश्विनला न खेळवून. षटकांचा वेग कमी झालाच त्यामुळे १०० टक्के फी देखील गमावली. याचबरोबर सामना देखील गमावला. रोहित शर्मा आणि राहुल द्रविडच्या या निर्णयावर टीकाही झाली होती. डब्ल्यूटीसी फायनल झाल्यावर आर आश्विन भारतात परतला आणि इतर खेळाडू युरोपमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी निघून गेले. 

आश्विनने भारतात येत तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये खेळण्यास सुरुवात केली. या सिझनमध्ये तो डिंडिगुल ड्रॅगन्सचा कप्तान आहे. त्याने पहिल्याच मॅचमध्ये आपल्या चेंडूने समोरच्या टीमला हलवून सोडले. आश्विनने दुसऱ्याच चेंडूवर विकेट घेतला. या मॅचमध्ये आश्विन संघाच्या चौथ्या ओव्हरसाठी आला होता. त्याच्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने डॅरिल फरेरोला आऊट केले. 

आश्विनने या सामन्यात ४ ओव्हरमध्ये २६ रन्स दिले आणि २ बळी घेतले. त्याने एक ओव्हर मेडन टाकली. चौथी ओव्हर थोडी महागडी गेली. त्रिचीचा फलंदाज राजकुमार याने सलग तीन चौकार ठोकले. मात्र अखेरच्या चेंडूवर आश्विनने राजकुमारची विकेट घेतली. 

आश्चर्याची बाब म्हणजे आयसीसीने बुधवारी टेस्ट रँकिंग जारी केली आहे. यामध्ये आर आश्विन एक नंबरवर आहे. तरीही भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळविले नाहीय. 

Web Title: The World No. 1 bowler was dropped in the WTC final by Team India, R Ashwin came to India and took two wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.