नवी दिल्ली : जर चेंडू यष्टिवर आदळत असेल तर फलंदाजाला बाद द्यायला हवे, असा प्रस्ताव आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी दिला आहे. पायचितच्या निर्णयात बदल करण्याचा प्रस्ताव देताना चॅपेल म्हणाले, चेंडूचा टप्पा कुठेही पडला असेल आणि चेंडू यष्टिवर आदळत असेल तर फलंदाजाला पायचित द्यायला हवे.
चॅपेल पुढे म्हणाले,‘कर्णधारांनी चेंडूवर मेहनत घेण्यासाठी सहमती दर्शवायला हवी. त्यामुळे स्विंग गोलंदाजीला प्रोत्साहन मिळले. कोविड-१९ नंतर क्रिकेट ज्यावेळी पुन्हा सुरू होईल त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद थुंकी ऐवजी कृत्रिम पदार्थचा वापर करण्यास स्वीकृती देण्याचा विचार करीत आहे.
चॅपेल यांनी आपल्या स्तंभात म्हटले की,‘पायचितच्या नियमामध्ये बदल व्हायला हवा. जर चेंडू बॅटला न लागता पॅडवर आदळत असेल आणि पंचाच्या मते चेंडू स्टंपवर आदळत असेल तर फलंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला असो किंवा नसो, पण त्याला बाद ठरवायला हवे. चेंडूचा टप्पा कुठे पडला हे विसरुन जात चेंडू यष्टिच्या दिशेने जात असताना पॅडवर आदळला याला महत्त्व द्यायला हवे.’
७६ वर्षीय चॅपेल यांच्या मते पायचितच्या नियमांमध्ये बदलाचे संकेत मिळाले तर फलंदाज टीका करतील, पण त्यामुळे क्रिकेट अधिक निष्पक्ष होईल.
चॅपेल म्हणाले,‘निश्चितच या नियमावर फलंदाज टीका करतील, पण त्यामुळे बऱ्याच सकारात्मक बाबी येतील. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे क्रिकेट निष्पक्ष होईल. जर गोलंदाज नियमितपणे यष्टिला लक्ष्य करीत असेल तर फलंदाजाला केवळ बॅटने आपली विकेट वाचविता येईल. पॅड फलंदाजांना दुखापत टाळण्यासाठी असून बाद होण्यापासून बचावासाठी नाही.’
चॅपेल पुढे म्हणाले,‘त्यामुळे मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणाºया गोलंदाजाने डाव्या यष्टिबाहेर टाकलेल्या चेंडूविरुद्ध उजव्या हाताने फलंदाजी करणाºया फलंदाजाला आक्रमक पवित्रा स्वीकारावा लागेल.’
चॅपेल यांनी सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले. सचिनने भारतात १९९७-९८ च्या मालिकेदरम्यान शेन वॉर्नच्या राऊंड द-विकेट गोलंदाजीच्या रणनीतीला चांगले उत्तर दिल्याचे सांगताना चॅपेल म्हणाले,‘१९९७-९८ मध्ये चेन्नईमध्ये राऊंड-द- विकेट गोलंदाजी करणाºया शेन वॉर्नविरुद्ध सचिनने आक्रमक व यशस्वी पवित्रा स्वीकारला होता. डाव्या यष्टिबाहेर पडलेल्या व यष्टिच्या रोखाने येणारा चेंडू फलंदाज पॅडने अडविताना बघणे तुम्हाला आवडेल ?
चॅपेल म्हणाले,‘सध्याचे नियम डाव्या यष्टिच्या बाहेर टप्पा पडलेले चेंडू पॅडने खेळण्यास प्रोत्साहित करणारे आहेत, पण हा बदल झाला तर फलंदाजाला बॅटने खेळण्यास बाध्य व्हावे लागेल. या बदलामुळे यष्टिच्या रोखाने मारा करणाºया गोलंदाजांना लाभ होईल आणि आॅफ साईटला अधिक क्षेत्ररक्षक तैनात करीत लेग साईडच्या बाहेर नकारात्मक गोलंदाजी करण्याची गरज कमी भासेल.’
थुंकीविना चेंडूला लकाकी देण्याच्या पद्धतीवर बोलताना चॅपेल म्हणाले, आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी चेंडूवर काम करण्याची पद्धत शोधायला हवी. चॅपेल म्हणाले,‘चेंडू छेडछाड नेहमीच मोठा मुद्दा ठरला आहे. यापूर्वी मी सूचना केली होती की प्रशासकांनी आंतरराष्ट्रीय कर्णधारांना, गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यास मदत होईल, अशा कृत्रिम पदार्थांची यादी तयार करण्यास सांगावे. या यादीतून प्रशासकांनी एका पद्धतीची निवड करावी व त्याला वैधता प्रदान करावी. अन्य सर्व पद्धतींना अवैध ठरवून शिक्षा द्यायला हवी.’ (वृत्तसंस्था)
Web Title: ... then the batsman should be give Out : Chappell
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.