मेलबोर्न : प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळाल्यास भारताविरुद्ध ‘बॉक्सिंग डे कसोटी’(२६ डिसेंबर) मेलबोर्नमध्येच खेळली जाईल, असे क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे अंतरिम प्रमुख निक हॉकले यांनी शनिवारी सांगितले. व्हिक्टोरियात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने हा सामना अॅडिलेड येथे होऊ शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
११ आॅक्टोबर ते ३ जानेवारी या काळात भारताला आॅस्ट्रेलिया दौऱ्यात चार कसोटी, तसेच प्रत्येकी तीन वन डे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. हॉकले म्हणाले, ‘प्रेक्षकांना मैदानात प्रवेश असेल तर कसोटी मेलबोर्नमध्येच होईल. सध्या असलेल्या कठोर नियमात शिथिलता येईल आणि प्रेक्षक मैदानात येऊन आनंद लुटू शकतील, अशी अपेक्षा आहे. ही मालिका महत्त्वाची असल्याने तयारीला लागलो आहोत. भारतीय संघाला येथे येण्याची परवानगी मिळेल, अशी आशा असल्याचे हॉकले यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
Web Title: ... then the Boxing Day Test in Melbourne
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.