Join us  

...तर भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका ऑगस्टमध्ये

सर्वप्रथम आम्हाला खेळाडूंसाठी ‘ग्रीन झोन’मध्ये अनुकूलन शिबिर आयोजित करावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 1:37 AM

Open in App

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये सुधारणा झाल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ यापूर्वीच्या करारानुसार आॅगस्टच्या शेवटी तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळू शकतात.सध्या या मालिकेचा कार्यक्रम आॅगस्टच्या शेवटी निर्धारित आहे, पण क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे (सीएसए) कार्यवाहक मुख्य कार्यकारी जॉक फॉल म्हणाले की, भारतीय क्रिकेट बोर्ड व सीएसएला यानंतरही या मालिकेच्या आयोजनावर आक्षेप नाही.गुरुवारी आॅनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना फॉल म्हणाले, ‘भारत आपल्या कराराचा आदर राखण्यास प्रयत्नशील आहे. जर ही मालिका स्थगित झाली तर यानंतरही याचे आयोजन करता येईल.’ सीएसएचे अधिकारी म्हणाले, ‘आमचे त्यांच्यासोबत (बीसीसीआय) संबंध चांगले आहेत.’ बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच या मालिकेच्या आयोजनाची शक्यता आहे.सर्वप्रथम आम्हाला खेळाडूंसाठी ‘ग्रीन झोन’मध्ये अनुकूलन शिबिर आयोजित करावे लागेल. निश्चितच परिस्थिती चांगली झाली तर आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळू.’ बीसीसीआयची या द्विपक्षीय मालिकेच्या आयोजनास सहमती असल्याचा अर्थ जर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वकप स्पर्धेऐवजी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आयोजनाचा प्रयत्न केला तर त्यांना नक्कीच सीएसएचे समर्थन राहील. सीएसएने म्हटले आहे की, मालिका भारत व दक्षिण आफ्रिका या दोन देशांच्या सरकारच्या मंजुरीवर अवलंबून राहील. फॉल म्हणाले की, त्यांनी दक्षिण आफ्रिका सरकारकडे मंजुरी मिळविण्याच्या प्रक्रियेत सुरुवात केली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :टी-20 क्रिकेट