भारतीय संघातील युवा जलगती गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील टी-२० मालिकेतून त्याने अगदी झोकात पदार्पण केले. कमालीचा वेग अन् चूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा हा युवा गोलंदाज आगामी आयपीएलमध्ये मालामाल होण्याचे संकेतही त्याच्या धमाकेदार एन्ट्रीतून मिळाले आहेत. लखनऊ सुपर जाएंट्स संघानं गत हंगामात त्याला २० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. आगामी मेगा लिलावाआधी LSG चा संघ या युवा फास्टर सन्सेशनला आपल्या ताफ्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. टीम इंडियात एन्ट्रीमुळे कॅप्ड खेळाडूंच्या यादीतून त्याला किमान ११ कोटी रुपये अगदी सहज मिळू शकतील.
काय आहे रिटेन पॉलिसी? कोणत्या क्रमांकावरील खेळाडूला किती रुपये मिळणार?
आयपीएलमध्ये RTM सह ६ खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. थेट रिटेन करण्यात येणाऱ्या ५ खेळाडूंसाठी सॅलरी स्लॅब निश्चित झाला आहे. त्यानुसार, पहिल्या क्रमांकावर रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूला १८ कोटी, दुसऱ्या खेळाडूला १४ कोटी आणि तिसऱ्या खेळाडूला ११ कोटीसह रिटेन करता येणार आहे. फ्रँचायझी संघाने चौथ्या आणि पाचव्या खेळाडूला रिटेन करण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा क्रमश: या दोन खेळाडूंसाठी संघ मालकांना १८ कोटी आणि १४ कोटी अशी रक्कम मोजावी लागेल. ३१ ऑक्टोबर खेळाडू रिटेन रिलीज करण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी LSG चा संघ मयंक यादवला रिटेन करेल, अशी अपेक्षा आहे. तो सुरुवातीच्या तीन खेळाडूंपैकी एक असू शकतो.
LSG चा संघ कोणत्या खेळाडूंवर दाखवू शकतो विश्वास?
आयपीएलच्या मेगा लिलावाआधी LSG चा संघ भारताचा अनुभवी बॅटर लोकेश राहुल, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक आणि कॅरेबियन सुपर स्टार निकोल पूरन आणि मार्कस स्टॉयनिस या खेळाडूंचा अगदी गांभिर्याने विचार करेल, असे वाटते. मेगा लिलावाआधी मुख्य कोच जस्टिन लँगर आणि सल्लागारच्या रुपात LSG संघाला जॉईन झालेला झहीर खान हा २२ वर्षीय जलदगती गोलंदाजाला प्राधान्य देईल, असे वाटते.
गत दोन हंगामापासून LSG च्या ताफ्यातून दिसलाय मयंक यादव
मयंक यादव ही लखनऊ सुपर जाएंट्सची एक मोठी गुंतवणूक आहे, याचे चित्र मेगा लिलावाआधी स्पष्ट होईल. गत दोन हंगामापासून हा युवा गोलंदाज LSG फ्रँचायझी संघासोबत आहे. प्रत्येकी हंगामात २० लाख या मूळ किंमतीसह लखनऊच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात ठेवले आहे. आता टीम इंडियात एन्ट्री केल्यानंतर त्याचा भाव वाढला, तर नवल वाटणार ना