जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर न्यूझीलंड संघानं मोठ्या ऐटीत नाव कोरलं... भारतीय संघ समोर असताना आणि जगातील सर्वाधिक फॅन्स हे ५ कोटी लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडच्या मागे उभे राहण्याची शक्यता फार कमीच होती. त्यामुळे भारतीयांनी विराट कोहली अँड टीमला विजेत्याच्या रुपात पाहायला सुरुवात केली होती. पण, बुधवारी साऊदॅम्प्टन येथे सुर्योदय झाला, तो न्यूझीलंडच्या विजयाचा निर्धार पाहू अजून लख्ख प्रकाश देत राहिला.. पहिला व पाचवा दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर टीम इंडियाला सामन्यात आघाडी घेताना पाहून सहाव्या दिवशी पाऊस नको, अशी प्रार्थना करणारे भारतीय अचानक सामन्याचे चित्र बदलल्यानंतर वरुणराजाला हाक मारू लागले... न्यूझीलंडच हा जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाचा खरा मानकरी आहे, हे मनोमन भारतीयांनाही माहित होतं अन् खऱ्या क्रिकेटप्रेमीच्या मनातही तिच इच्छा होती... WTC Final 2021, WTC Final 2021
५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशासमोर १.४ अब्ज लोकांचा देश हरला; मायकेल वॉननं टीम इंडियाला डिवचलं!
२०१५ व २०१९च्या वर्ल्ड कपनं न्यूझीलंडला जेतेपदापासून दूर ठेवले. त्यात २०१९चा वर्ल्ड कप हा कागदोपत्री इंग्लंडच्या नावावर असला तरी खरा विजेता हा किवी संघच आहे, हे आजही आणि यापुढेही क्रिकेटचाहते ठामपणे सांगतिल. कारण इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर फायनलमध्ये दोन वेळा बरोबरीत समाधान मानायला लावलं आणि फक्त चौकार कमी या निकषावर किवींना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. इंग्लंडच्या संघालाही मनोमनी वन डे वर्ल्ड कपचे जेतेपद ज्या पद्धतीनं नावावर झालं, त्याची लाज वाटत असावी. २०१९च्या त्या पराभवानंतर कोणताही संघ खचला असता, परंतु केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली हा संघ आणखी जोमानं उभा राहिला. न्यूझीलंड संघाची ती खासियतच आहे....Ind vs NZ Test Final, WTC final 2021
ब्रेंडन मॅक्युलमनं या संघात आक्रमकता आणली आणि केन विलियम्सननं त्या आक्रमकतेला शालिनतेची जोड दिली. त्यामुळेच जेव्हा जेव्हा भारत-न्यूझीलंड सामना होतो, मग तो कोणत्याही फॉरमॅटचा असो, तेव्हा तेव्हा भारतीयांच्या मनाचा एक कोपरा किवींच्या बाजूनं नक्की असतो. हे या संघाचे खरे यश आहे. स्लेजिंग, आक्रसताळेपणा, अंगावर धावून जाणं हे या संघाला कधी जमलेच नाही किंबहुना त्यांना हे पटतच नाही. प्युअर क्रिकेट... हेच त्यांच्या ध्यानीमनी वसलेले आहे. त्यामुळे जे काही प्रत्युत्तर द्यायचे ते खेळातून अन् तेही कोणतीही मर्यादा न ओलांडता... वन डे वर्ल्ड कप नंतर आयसीसीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली अन् जून २०१९पासून ही स्पर्धा सुरू झाली...IND vs NZ World Test Championship
टीम इंडिया WTC फायनलमध्ये का हरली?; सचिन तेंडुलकरनं सांगितलं महत्त्वाचं कारण