नवी दिल्ली : विश्वचषकात ५० षटकांचे सामने ‘टाय’ झाल्यास विजेता चषक दोन्ही संघांना विभागून देण्यात यावा. ‘सुपर ओव्हर’ची देखील गरज नसल्याचे मत न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने व्यक्त केले आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या निकषावर विजेतेपद बहाल करण्यात आले होते. निर्धारित वेळेत आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटल्यामुळे आयसीसीने चौकारांच्या निकषाचा नियम लावला. मात्र यासाठी आयसीसीला चाहत्यांचा रोषांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आयसीसीने नियमांमध्ये बदल करून, निकाल लागेपर्यंत उपांत्य आणि अंतिम सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
टेलर पुढे म्हणाला, ‘एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हरच्या नियमाबद्दल मी अद्याप साशंक आहे. गेली अनेक वर्ष वन-डे क्रिकेट सुरू आहे, त्यामुळे एखादा सामना जर बरोबरीत सुटल्यास गुणविभागणी करून द्यावी. टी-२० क्रिकेटमध्ये सुपर ओव्हरचा नियम समजू शकतो. मात्र वन डे क्रिकेटमध्ये या नियमाची गरज नाही. ’ ‘विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान मी पंचाजवळ गेलो आणि सामना चांगला झाला असे बोललो. त्यानंतर मला समजले की सुपर ओव्हर खेळवणार आहे. वन-डे क्रिकेटमध्ये १०० षटकांनंतर जर सामन्याचा निकाल लागणार नसेल तर दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत.
Web Title: There is no need for One Day Super Over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.