ग्रॅमी स्मिथ -
द. आफ्रिकेचा नागरिक या नात्याने मला स्वत:वर गर्व वाटतो. संघाची इतकी खराब कामगिरी पाहून वेदनाही झाल्या. द. आफ्रिकेसाठी या विश्वचषकात काहीही सकारात्मक नव्हते. हा संघ ज्या संघर्ष, क्षमता आणि आत्मविश्वासासाठी ओळखला जातो त्या गोष्टी येथे दृष्टीस पडल्या नाहीत.
पहिल्या सामन्यापासून असे वाटत होते की ही नौका चालविण्यासाठी कुणी नावाडीच नाही. संघाकडे आता इभ्रत शाबूत राखण्यासाठी दोन सामन्यांची संधी आहे. श्रीलंका आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध आमच्या संघाची वाटचाल सोपी असेल असे मात्र वाटत नाही. असे झाल्यास नऊपैकी केवळ एक सामना जिंकणे ही कमकुवत आणि निराशादायी कामगिरी मानली जाईल.
लंकेवर नजर टाका. सुरुवातीला होता तसा आता हा संघ राहिलेला नाही. फरक असा की या संघातील वरिष्ठांनी चांगली कामगिरी करणे सुरू केले आहे. इंग्लंडवरील लंकेच्या विजयामुळे स्पर्धा अधिक खुली झाली. विजय मिळविण्यासाठी क्षमता आणि कौशल्य लागते.
लंकेसाठी चांगली बाब अशी की लसिथ मलिंगा फॉर्ममध्ये परतला आहे. इंग्लंडविरुद्ध त्यांनी शानदार खेळ केला. त्याच्या फिटनेसबाबत अनेक गोष्टी चर्चेत आल्या. पण माझ्यामते नव्या चेंडूवर बळी घेण्याची क्षमता कायम असल्याने मलिंगा आनंदी असेल. मलिंगाला अनेकजण ‘डेथ ओव्हर स्पेशालिस्ट’मानतात,
पण इंग्लंडविरुद्ध नव्या चेंडूवर त्याने कमाल केली. द. आफ्रिकेची आघाडीची फळी मलिंगाचे चेंडू कसे खेळतो यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.
द. आफ्रिका फारच बचावात्मक खेळताना दिसला. यामुळे प्रतिस्पर्धी संघाला वर्चस्व गाजविण्याची संधी मिळते. पण दुसऱ्या बाजूने विचार केल्यास आता स्पर्धेबाहेर झाल्यामुळे आफ्रिकेवर कुठल्याही प्रकारचे दडपण राहणार नाही. लंका संघाला अँजेलो मॅथ्यूजसह आघाडीच्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. ब्रिटनमध्ये खेळपट्टी टणक झाली की फिरकीला अनुकूल बनते. हीच बाब श्रीलंकेला पूरक ठरू शकते.
या सामन्यात मला
द. आफ्रिकेच्या विजयाची अपेक्षा आहे. मागील पाच एकदिवसीय सामन्यांत द. आफ्रिकेने लंकेला नमविल्यामुळे या सामन्यातही आफ्रिकेचे पारडे जड असेल असे दिसते. स्पर्धा सुरू होण्यापर्यंतचा इंग्लंडचा फॉर्म पाहिला असेल, तर आता इंग्लंडची अशी स्थिती होईल, यावर विश्वास बसत नाही.
Web Title: There is no pressure on South Africa now
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.