Join us  

मधल्या फळीत क्षमता सिद्ध करण्याची संधी होती : पांडे

सामानावीर ठरलेला पांडे म्हणाला, ‘आमच्या मधल्या फळीबाबत बरेच बोलले जायचे. काल मधल्या फळीची ताकद सिद्ध करण्याची संधी होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 6:20 AM

Open in App

दुबई : राजस्थान रॉयल्सिवरुद्ध आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीत क्षमता सिद्ध करण्याच्या निधार्राने खेळून यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया सनरायजर्स हैदराबादच्या विजयाचा हिरो मनीष पांडे याने व्यक्त केली. दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेली एक चांगली खेळी करण्यात यशस्वी ठरल्याबद्दल पांडेने आनंद व्यक्त केला. सनरायजर्सला सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरेस्टो यांच्याकडून चांगली सुरुवात मिळत होती, त्यामुळे मधल्या फळीला तितकेसे प्रयत्न करावे लागत नव्हते. राॅयल्सिवरुद्ध वॉर्नर आणि बेयरेस्टो लवकर बाद झाल्यानंतर पांडेने नाबाद ८३ आणि विजय शंकरने नाबाद ५२ धावा ठोकून संघाचा विजय साकार केला.

सामानावीर ठरलेला पांडे म्हणाला, ‘आमच्या मधल्या फळीबाबत बरेच बोलले जायचे. काल मधल्या फळीची ताकद सिद्ध करण्याची संधी होती. आम्ही लेगस्पिनर आणि वेगवान गोलंदाजांना टार्गेट केले होते. जोफ्रा आर्चरचे चेंडू सावधपणे खेळत राहिलो.’ वॉर्नरने शंकर आणि पांडे यांची कामगिरी शानदार झाल्याचे सांगून आम्ही अशाच कामगिरीची अपेक्षा बाळगली होती. याशिवाय जेसन होल्डरने गोलंदाजीत उपयुक्तता सिद्ध केली. या अष्टपैलू खेळाडूने अनुभव पणाला लावल्याचे वॉर्नरने सांगितले.

पराभूत राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला, ‘माझ्या मते आम्ही सुरुवात चांगलीच केली. खेळपट्टीने नंतर हैदराबादला साथ दिल्यामुळे आम्ही दडपण कायम राखू शकलो नाही.’ 

टॅग्स :IPL 2020दुबईक्रिकेट सट्टेबाजी