कौटुंबिक कलहामुळे भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी याचे मानसिक स्थैर्य ढासळले होते आणि त्यामुळेच त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला होता. शमीनं स्वतः त्याबाबत मोठा खुलासा केला. पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांमुळे शमी बराच चर्चेत आला होता. पण, या कठीण काळात कुटुंबीयांनी त्याची साथ सोडली नाही आणि त्याला या संकटकाळात आधार दिला. कुटुंबीयांनी मला कधीच एकटं पडल्याची जाण होऊ दिली नाही, असे शमीने सांगितले.
औदासिन्यच्या मुद्द्यावर शमीनं सर्वांचे लक्ष वेधले. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर औदासिन्याचा मुद्दा पुन्हा चर्चीला जात आहे. या समस्येकडे सर्वांचं लक्ष वेधण्याची गरज आहे आणि अशा परिस्थितीत लोकांनी सल्लागाराशी किंवा जवळच्या व्यक्तीशी बालावे, अशी विनंती शमीनं केली.
तो म्हणाला,''माझ्याबाबतीत कुटुंबीयांनी मला नैराश्याच्या छायेतून बाहेर काढले. त्यांनी माझी काळजी घेतली आणि या समस्येवर मात करायला हवी, याची जाणीव त्यांनी मला करून दिली. एक काळ असा आलेला की मीही आत्महत्येचा विचार केला होता, परंतु कुटुंबीयांनी मला एकटं वाटू दिलं नाही. माझ्या आजूबाजूला नेहमी कुणीतरी सतत असायचे, माझ्याशी ते बोलायचे. अध्यात्मातूनही तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर मिळतात. जवळच्या व्यक्तीसोबत बोला किंवा सल्लागारांचा सल्ला घ्या.''
हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले. बीसीसीआयनं त्याची चौकशी करून शमीची निर्दोष मुक्तता केली. या प्रसंगानं शमी प्रचंड खचला होता, परंतु त्यानं कमबॅक केले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यानं दमदार कामगिरी केली. टीम इंडियाचे सहकारी आणि कर्णधार विराट कोहली यांचेही शमीनं आभार मानले.
तो म्हणाला,''मानसिक तणाव तुमच्या शरिरावरही परिणाम करतो. त्याचवेळी जर तुम्ही इतरांकडून मदत मागितली तर त्यावर मात करता येते. त्या बाबतितही मी स्वतःला नशीबवान समजतो. माझे सहकारी आणि विराट कोहली यांनी नेहमी मला पाठींबा दिला. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. आता तो कठीण काळ गेलाय, याचा मला आनंद वाटतोय.''
भारतीयांवर भडकली 'पॉर्न स्टार' रेनी ग्रेसी; दिली कायदेशीर कारवाईची धमकी!
माझं घरच तू होतीस गं... आईच्या निधनानंतर SRHच्या क्रिकेटपटूला दुःख अनावर
सुशांत सिंग राजपूतला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही; मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला भावनिक