मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या २०२२ मधील हंगामाची सुरुवात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. बीसीसीआयने याबाबतची तयारी सुरू केली आहे. लवकरच बोर्डाकडून आयपीएलसाठीचे मीडिया राईट्सचे टेंडर्स निघणार आहेत. मात्र यावेळच्या आयपीएलमध्ये एक मोठा बदल दिसणार आहे. सामन्यातील डावात जो स्ट्रॅटर्जिक टाईम आऊट असतो, त्याची वेळ वाढवण्याची तयारी दिसत आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये मीडिया राईट्ससाठीचे मूल्य हे हजारो कोटी रुपयांमध्ये आहेत. अशा परिस्थितीत कंपन्यांना पैशांची भरपाई करण्याची संधी उपलब्ध करून दिली आजणार आहे. त्यामुळे स्ट्रॅटर्जिक टाईम आऊटची वेळ वाढवण्याची तयारी सुरू आहे.
आयपीएलमध्ये जेव्हा कुठलाही सामना होतो, तेव्हा एका डावात दोन टाइम आऊट घेतले जातात. एक बँटिंग टीम कडून आणि दुसरा बॉलिंग टीमकडून घेतला जातो. आतापर्यंत हा स्ट्रॅटर्जिक टाईम १५० सेकंदांचा असे. मात्र आता तो वाढवून तीन मिनिटांचा केला जाणार आहे. म्हणजेच त्यामध्ये ३० सेकंदांची वाढ होणार आहे. हे तीस सेकंद खूप आहे.
आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. तर मे महिन्यामध्ये अंतिम सामना होणार आहे. आयपीएलमधील ५५ सामने मुंबईत होणार आहेत, तर १५ सामने हे पुण्यामध्ये होणार आहेत. बीसीसीआयने सध्यातरी लीग सामन्यांची माहिती दिली आहे. तर प्ले ऑप लढतींच्या ठिकाणांची घोषणा नंतर सुरू केली जाणार आहे.
यंदाच्या आयपीएलचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होणार आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाची ही पहिली आयपीएल आहे. त्यामुळे यावेळी अधिक सामने खेळले जाणार आहेत. तसेच आयपीएलचे अधिक सामने खेळले जाणार आहेत. त्यामुळेच मीडिया राइट्स, स्ट्रॅटर्जिक टाइम आऊटची वेळ वाढवण्यात आली आहे.