मुंबई : ‘विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय संघात प्रयोग केले जाणार नाहीत,’ असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले. तसेच ‘आॅस्ट्रेलिया दौऱ्यात आमचे सर्वाधिक लक्ष फलंदाजीवर असेल. कारण गेल्या काही सामन्यांपासून गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. अष्टपैलू खेळाडूंनी फलंदाजीत पुरेसे योगदान दिल्यास अडचणी येणार नाहीत,’ असे कर्णधार विराट कोहलीने म्हटले.
भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी आॅस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्याआधी कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक शास्त्री यांनी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात फलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगताना कोहलीने म्हटले की, ‘या दौऱ्यात नक्कीच फलंदाजीवर आमचे मुख्य लक्ष असेल. गोलंदाज शानदार कामगिरी करीत असून ते आपल्या कामगिरीत सातत्य राखतील याचा विश्वास आहे. शिवाय अष्टपैलू खेळाडूंनी संघाच्या धावसंख्येमध्ये योगदान दिले, तर आम्ही कोणत्याही सामन्याचे किंवा मालिकेचे चित्र पालटू शकतो. इंग्लंड दौºयातील लॉडर््स कसोटी सामन्याचा अपवाद वगळता आम्ही छोट्या - छोट्या स्वरूपात चांगली फलंदाजी केली. तसेच, एकाचवेळी सर्व फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. मात्र आॅस्ट्रेलिया दौºयात फलंदाजीत सुधारणा होईल अशी आशा आहे.’
यावेळी कोहलीने प्रशिक्षक शास्त्री यांचे कौतुक केले. त्याने सांगितले की, ‘रवी शास्त्री व्यवस्थापनात माहीर आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसारच मी माझ्या खेळात बदल केले आणि याचा खूप फायदा झाला.’त्याचबरोबर सर्वाधिक नकार शास्त्रीकडूनच मिळतात, असेही कोहलीने म्हटले. तो म्हणाला की, ‘कोणत्याही गोष्टीसाठी मला सर्वाधिक नकार शास्त्रीकडूनच मिळतात; पण या सर्व गोष्टी वैयक्तिक असतात. संघात सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. एक दिवस माझे क्रिकेट संपेल, शास्त्रीही निघून जातील. आम्ही केवळ आमच्यावर सोपविलेली जाबाबदारी निभावतोय. क्रिकेटला पुढे घेऊन जायचे हेच सर्वांचे लक्ष्य आहे. २०१४ सालचा माझा इंग्लंड दौरा व २०१५ साली शिखर धवनला दबावातून बाहेर काढण्यात शास्त्री यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार मी संघात अनेक बदल केले.’‘खेळाडू बदलण्यास आमच्याकडे वेळ नाही’विंडीजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपर्यंत भारतीय संघाने आगामी विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने अनेक प्रयोग केले. मात्र आता प्रयोगाची वेळ संपल्याचे स्पष्ट करताना शास्त्री म्हणाले की, ‘आॅस्टेÑलियामध्ये होणारी एकदिवसीय मालिका विश्वचषक स्पर्धेअगोदरची असल्याने ही मालिका आम्ही अत्यंत गांभीर्याने घेणार असून यामध्ये कोणताही हलगर्जीपणा राहणार नाही. अशावेळी कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त होणं किंवा त्याला संघाबाहेर करणं आम्हाला परवडण्यासारखं नाही. संघात प्रयोग करण्याची ही वेळ नसून आमच्याकडे आता कोणत्याही खेळाडूला हटविण्यास किंवा बदल करण्यासही वेळ नाही.’माझ्याकडे विजयाशिवाय दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नाही. संघाची तंदुरुस्ती जबरदस्त असून सर्वजण आॅस्टेÑलियामध्ये शानदार कामगिरी करण्यास सज्ज आहेत.- विराट कोहली