नवी दिल्ली : फिरोजशाह कोटलावर तिस-या कसोटीदरम्यान प्रदूषणामुळे श्वास कोंडल्याची तक्रार श्रीलंका खेळाडूंनी वारंवार केली. पण तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. बीसीसीआयने मात्र रोटेशन पद्धतीचे कारण पुढे करीत दिल्लीला २०२० पर्यंत सामना आयोजनापासून दूर ठेवले आहे.
धुक्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लंकेच्या खेळाडूंनी तक्रार केली. त्यांनी खेळताना मास्क घातल्यामुळे दिल्लीच्या आंतरराष्टÑीय आयोजनावर प्रश्नचिन्ह लागले. यासंदर्भात बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाºयाने सांगितले की, भविष्यातील दौरा कार्यक्रमानुसार दिल्लीला २०२० पर्यंत सामना आयोजनापासून दूर ठेवण्याचा विचार आहे. कोटलावर प्रदूषणाचा त्रास होत असल्याबद्दल बीसीसीआयने थेट कबुली न देता रोटेशन पद्धतीचे निमित्त पुढे केले असावे.
श्रीलंका संघातील खेळाडूंनी आता तक्रार केली, पण मागच्या महिन्यात दिल्ली अर्धमॅरेथॉनदरम्यान येथे असाच वाद झाला होता. प्रदूषणाचा स्तर उच्च असताना हे आयोजन झाले होते. ‘आयएमए’ने आयोजन रद्द करण्याचे आवाहन केले होते. रविवारी दुसºया दिवशी श्वास घेण्यास येत असलेल्या अडचणीमुळे २६ मिनिटांचा खेळ वाया गेला होता. यामुळे भारताला पहिला डाव निर्धारीत वेळेच्याआधी घोषित करावा लागला.
त्यानंतर बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी दिल्लीत डिसेंबर महिन्यात कसोटी सामना आयोजनाबद्दल फेरविचार करण्याची कबुली दिली होती. पण त्याचवेळी दुसरीकडे कोटलाला कोट्यानुसार सामने मिळाले आहेत. त्यांना आता २०२० च्या आधी सामने मिळणार नाहीत. २०२० मध्ये प्रदूषणाचा स्तर काय असेल, हे २०१७ मध्ये निश्चित करणे कठीण असल्याचे चौधरी यांचे मत होते. (वृत्तसंस्था)
Web Title: There will be no cricket in Delhi till 2020
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.