सध्या विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ विजयाची चव चाखत आहे. विराटसेना प्रत्येक मालिकेनंरतर एक नवा अध्याय रचताना आपल्याला पहायला मिळत आहे. आज झालेल्या नागपूर कसोटीमध्ये भारतानं श्रीलंकेचा एक डाव आणि 239 धावांनी पराभव केला. हा आतापर्यंतचा भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. आज भारतीय संघानं जिंकलेल्या पाच विराट विजयाबद्दल जाणून घेणार आहोत....
नागपूर कसोटी 2017 - दुसऱ्या कसोटीमध्ये भारतानं श्रीलंकेचा एक डाव आणि 239 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतानं सर्वच स्तरावर श्रीलंकेवर मात केली. श्रीलंकेच्या कर्णधारानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय गोलंदाजीनी टिच्चून मारा करत पहिला डाव 205 धावांच संपुष्टात आणला. त्यानंतर भारतीय संघानं प्रथम फंलदाजी करताना कर्णधार विराट कोहीलचे द्विशतक आणि रोहित, पुजारा, विजय यांच्या शतकांच्या बळावर सहा बाद 310 धावांचा डोंगर उभा करत लंकेसमोर 405 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी लेंकेच्या फलंदाजांना वाव दिला नाही. लंकेचे सर्व फलंदाज 166 धावांवर बाद झाला. आणि भारतानं हा सामना एक डाव आणि 239 धावांनी जिंकला. या सामन्यात विराट कोहली आणि आर. अश्विन विजयाचे शिल्पकार ठरले. अश्विनने या सामन्यात 8 बळी घेतलेय
भारताचा बांगलादेशवर ऐतिहासीक विजय (2007) - 2007 मध्ये ढाका कसोटीत भारताने बांगलादेशचा एक डाव व 239 धावांनी पराभव करत विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला होता. भारताचा कसोटीतील हा सर्व्वात मोठा कसोटी विजय आहे. पाच दिवसाची कसोटी भारताने तीन दिवसाच्या आत संपवत दोन कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. भारताने पहिल्या डावात तीन बाद 610 धावांचा डोंगर रचल. त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशचा पहिला डाव सर्व बाद 118 धावांवर आटोपला. भारतला 492 धावांची महत्वपूर्ण आघाडी भेटली. डावखुरा गोलंदाज जहिर खानने 5 तर अनुभवी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने 3 बळी घेतले. फॉलोआन नंतर पुन्हा मैदानात उतरलेल्या यजमानांची सुरूवात खराब झाली सलामीवीर जावेद ओरम खातेही न फोडता तंबुत परतला. त्याला जहिर खानने बाद केले. मोहम्मद अश्रफुल 67 व वेगवान गोलंदाज मशरफे मुर्तजा 70 यांनी प्रतिकार केला मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.
ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव (1998) - भारताने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाला कोलकाता कसोटीत 1 डाव आणि 219 धावांनी पराभूत केले होते. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 233 धावांवर बाद केलं होतं. श्रीनाथ, गांगुली आणि कुंबळे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले होते. तर भारतानं पहिल्या डावात तुफानी फलंदाजी करताना पाच बाद 633 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताकडून अझह्रद्दीने 163 धावांची खेळी केली होती. तर गांगुली, तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण आणि सिद्धू यांनी अर्धशतकी खेळी केली होती. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दाणादाण उडवत 181 धावांमध्ये बाद केले होतं. दुसऱ्या डावात कुंबळेनं पाच आणि श्रीनाथनं तीन बळी घेतले होते.
न्यूझीलंडचा पराभव (2010)-2010 मध्ये धोनीच्या कर्णधारपदाखाली भारतानं न्यूझीलंडचा एक डाव आणि 198 धावांनी पराभव केला होता. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंजासमोर सपशेल नांगी टाकली होती. न्यूझीलंडचा पहिला डाव 193 धावांमध्ये संपुष्टात आला. भारताकडून श्रीनाथ आणि हरभजनने प्रत्येकी तीन बळी घेतले होते. भारतानं पहिल्या डावात फलंदाजी करताना आठ बाद 566 धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावात न्यूझीलंडची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा डाव 175 धावांमध्ये संपुष्टात आला होता. आणि हा सामना भारतानं एक डाव आणि 198 धावांनी जिंकला होता.
लंकेचा पराभव (2017)-हार्दिक पांडय़ाच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिल्या डावात दुसऱया दिवशी १२२.३ षटकांत ४८७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला ३७.४ षटकांत १३५ धावांत गुंडाळून भारताने पहिल्या डावात ३५२ धावांची आघाडी घेत यजमानांवर फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावातही लंकेला फारसी कमाल दाखवता आली नाही. हा सामना भारतानं एक डाव आणि 171 धावांनी जिंकला होता.