Video: "हे खूप नशिबवान आहेत"; अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावला मोहम्मद शमी

शमीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 09:21 AM2023-11-26T09:21:32+5:302023-11-26T09:22:37+5:30

whatsapp join usJoin us
``These are very lucky''; Mohammad Shami ran to help the accident victims in nainitaal | Video: "हे खूप नशिबवान आहेत"; अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावला मोहम्मद शमी

Video: "हे खूप नशिबवान आहेत"; अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावला मोहम्मद शमी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने जबरदस्त कामगिरी केली. वर्ल्डकप स्पर्धेत भारत उपविजेता ठरला, कोट्यवधी भारतीयांच्या विश्वविजयाचे स्वप्न भंगले. मात्र, टीम इंडियाने शानदार कामगिरी करत देशवासीयांची मने जिंकली. त्यातच, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचं जगभरातून कौतुक झालं. क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक असलेला शमी तितकाच संवेदनशील असल्याचं दिसून येतं. सध्या शमी नैनितालमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून त्याने दाखवलेल्या तत्परतेचं आणि संवेदनशीलतेचं कौतुक होत आहे. 

शमीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एका अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीसाठी तो धावल्याचे दिसून येते. ''हे खूप भाग्यवान आहेत. परमेश्वराने यांना दुसरं जीवनदान दिलंय. नैनीतालमध्ये एका खोल दरीत कार पडली होती. विशेष म्हणजे ही कार माझ्या गाडीच्या पुढेच धावत होती. त्यामुळे, त्या गाडीला अपघात होताच, आम्ही तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धावलो आणि त्यांना सुरक्षितपणे गाडीतून बाहेर काढले,'' अशी माहितीही शमीने व्हिडिओसोबत दिली आहे. या व्हिडिओत शमी आणि त्याचे मित्र अपघातग्रस्त कारजवळ उभारल्याचं दिसून येत आहे. 

मोदींनी थोपटली पाठ, शमीने मानले आभार

दरम्यान, शमीने वर्ल्डकपमध्ये २४ विकेट्स घेत नवा विक्रम रचला. विश्वचषकातील शमीच्या याच कामगिरीबद्दल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रुममध्ये त्याची पाठ थोपटली होती. या भेटीनंतरही शमीने भावना व्यक्त करताना हा सन्मान असल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची भेट घेऊन धीर दिला, हे खूप महत्त्वाचे आहे. त्यावेळी आम्ही सामना गमावला होता. अशा परिस्थितीत जेव्हा पंतप्रधान तुम्हाला प्रोत्साहन देतात, तो एक वेगळा क्षण असतो. जेव्हा तुमचे मनोबल खचते तेव्हा तुमचे पंतप्रधान तुमच्यासोबत असतील तर आत्मविश्वास वाढतो आणि खूप धीर मिळतो, असे शमीने म्हटले होते. 
 

Web Title: ``These are very lucky''; Mohammad Shami ran to help the accident victims in nainitaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.