Join us  

ढसाढसा रडणारे हे खेळाडू...

चेंडूची छेडछाड केल्याची जबाबदारी स्मिथने स्वीकारली, पण कुटुंबियाचा विचार मनात आल्यावर त्याला अश्रू अनावर झाले. संपूर्ण जगाने त्याला रडताना पाहिले. पण असा रडणारा स्मिथ हा काही पहिला खेळाडू नक्कीच नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 4:54 PM

Open in App
ठळक मुद्देमुंबईच्या हरभजन सिंगने पंजाबच्या एस. श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावली होती.

मुंबई : ऑस्ट्रेलियातील पत्रकार परिषदेमध्ये स्टीव्हन स्मिथच्या अश्रूचा बांध फुटला. चेंडूची छेडछाड केल्याची जबाबदारी त्याने स्वीकारली, पण कुटुंबियाचा विचार मनात आल्यावर त्याला अश्रू अनावर झाले. संपूर्ण जगाने त्याला रडताना पाहिले. पण असा रडणारा स्मिथ हा काही पहिला खेळाडू नक्कीच नाही.

 

तुम्हाला 1996 साली भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषकातला उपांत्य फेरीचा सामना आठवला असेल. या सामन्यात श्रीलंकेने भारतापुढे 252 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरने 65 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली होती. पण सचिन बाद झाल्यावर मात्र भारताने 22 धावांत सहा फलंदाज गमावले होते. त्यानंतर कोलकात्यातील चाहत्यांना राग अनावर झाला. त्यांनी मैदानात जाळपोळ करायला सुरुवात केली. त्यावेळी विनोद कांबळी हा मैदानात होता. पण पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला आणि कांबळीला अश्रू अनावर झाले होते. या सामन्यात श्रीलंकेला विजयी ठरवण्यात आले होते.

आयपीएलच्या 2008 मोसमातही अशीच एक घटना झाली होती. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यतील सामन्यानंतरची ही घटना. मुंबईच्या हरभजन सिंगने पंजाबच्या एस. श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावली होती. त्यानंतर श्रीशांतला मैदानातच रडू कोसळले. त्यानंतर पंजाबच्या काही खेळाडूंनी त्याची समजूत घातली, पण श्रीशांत काहीच  ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

' ब्लेड रनर ' म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा ऑस्कर प्रिस्टोरियस हा न्यायालयात ढसाढसा रडला होता. घरामध्ये त्याने आपल्या प्रेयसीचा गोळी घालून खून केला होता. त्यानंतर न्यायालयात हे प्रकरण सुरु असताना त्याला अश्रू रोखता आले नव्हते.

' चोकर्स ' म्हणून दक्षिण आफ्रिकेचा संघ ओळखला जातो. 2015च्या विश्वचषकात त्यांचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. पण उपांत्य फेरीत त्यांना न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांच्या खेळाडूंनी मैदानातच अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :क्रिकेटस्टीव्हन स्मिथ