Join us  

या एका वर्ल्ड कपपुरते हे खेळाडू लक्षात राहणार नाहीत - राहुल द्रविड

भारताने चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली ते प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली. निश्चितच आपल्या संघाने केलेल्या या विश्वविजयी कामगिरीवर द्रविड प्रचंड आनंदी आणि समाधानी आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 5:26 PM

Open in App
ठळक मुद्देमला या संघाचा, सपोर्ट स्टाफचा त्यांनी जी मेहनत केली त्याचा अभिमान वाटतो. वर्ल्डकप विजयाचा हा क्षण त्यांना दीर्घकाळ आनंद देईल पण या एका स्पर्धेपुरता हे खेळाडू लक्षात राहू नयेत, करीयरमध्ये पुढे त्यांना अजून भरपूर काही मिळवायचे आहे.

नवी दिल्ली - भारताने चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली ते प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली. निश्चितच आपल्या संघाने केलेल्या या विश्वविजयी कामगिरीवर द्रविड प्रचंड आनंदी आणि समाधानी आहेत. अंडर-19 संघातील हे सर्व प्रतिभावंत खेळाडू फक्त या एका वर्ल्डकपपुरता आठवणीत राहणार नाहीत. त्यांना या पेक्षाही मोठा आणि आव्हानात्मक प्रवास करायचा आहे असा विश्वास राहुल द्रविड यांनी व्यक्त केला. 

मला या संघाचा, सपोर्ट स्टाफचा त्यांनी जी मेहनत केली त्याचा अभिमान वाटतो. मागचे 14 महिने आम्ही सगळे जी मेहनत घेत होतो त्याला तोड नाही असे द्रविड म्हणाले. वर्ल्डकप विजयाचा हा क्षण त्यांना दीर्घकाळ आनंद देईल पण या एका स्पर्धेपुरता हे खेळाडू लक्षात राहू नयेत, करीयरमध्ये पुढे त्यांना अजून भरपूर काही मिळवायचे आहे. असे आनंदाचे क्षण त्यांच्या वाटयाला येतील असे द्रविड म्हणाले. आम्ही 14 महिने घेतलेल्या मेहनतीला आज वर्ल्डकप विजयाच्या रुपाने फळ मिळाल्याची भावना द्रविड यांनी व्यक्त केली.

यापूर्वी दोनवेळा राहुल द्रविड यांना वर्ल्डकप विजयाने हुलकावणी दिली होती. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला त्यानंतर 2016 साली अंडर-19 संघाचे प्रशिक्षक असताना अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला होता. यावेळी पृथ्वी शॉ च्या संघाने ती कसर भरुन काढली आणि राहुल द्रविडच्या हाती अखेर वर्ल्डकप ट्रॉफी आली.  

टॅग्स :राहूल द्रविडभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत