लीड्स - जो रुट आणि इयॉन मॉर्गन यांच्या संयमी आणि चतुर खेळीने इंग्लंडला तिसऱ्या वन डे सामन्यात भारताविरूद्ध 8 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयासह इंग्लंडने ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. इंग्लंडने सलग आठवी द्विदेशीय वन डे मालिका जिंकून नवा विक्रम रचला. मात्र, या पराभवाने भारताची विक्रमाची संधी हिरावली. गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर जो रुट (१००*) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन (८८*) यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा 8 विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणा-या भारताला ५० षटकांत ८ बाद २५६ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने ४४.३ षटकांत २ बाद २६० धावा करत बाजी मारली. इंग्लंडने 2011सालानंतर घरच्या मैदानावर भारताविरूद्ध मिळवलेला हा पहिलाच मालिका विजय ठरला. इंग्लंडने विक्रमी कामगिरी केली असताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला प्रथमच वन डे मालिकेत पराभव पत्करावा लागला. या मालिकेपूर्वी भारताने सलग नऊ वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 7 मालिका जिंकल्या होत्या. भारताने 2016 साली ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरूद्ध अखेरचा मालिका पराभव पत्करला होता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कोहलीच्या नेतृत्वाखाली घडली नको असलेली गोष्ट.. भारताला विक्रमाची हुलकावणी
कोहलीच्या नेतृत्वाखाली घडली नको असलेली गोष्ट.. भारताला विक्रमाची हुलकावणी
जो रुट आणि इयॉन मॉर्गन यांच्या संयमी आणि चतुर खेळीने इंग्लंडला तिसऱ्या वन डे सामन्यात भारताविरूद्ध 8 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयासह इंग्लंडने ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. या पराभवाने भारताची विक्रमाची संधी हिरावली.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 10:43 AM