Ms Dhoniच्या हेअर स्टायलिस्टची नोकरी धोक्यात; Video पाहून कळेल खरं कारण

मागली नऊ महिन्यांपासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 03:47 PM2020-04-04T15:47:51+5:302020-04-04T15:49:41+5:30

whatsapp join usJoin us
'Think I have lost my job,' - MS Dhoni's hairstylist shares adorable video of Ziva svg | Ms Dhoniच्या हेअर स्टायलिस्टची नोकरी धोक्यात; Video पाहून कळेल खरं कारण

Ms Dhoniच्या हेअर स्टायलिस्टची नोकरी धोक्यात; Video पाहून कळेल खरं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगवरही ( आयपीएल 2020) अनिश्चिततेचं सावट असल्यानं धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमनाचा मार्गही खडतर बनला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला आहे आणि त्यामुळे खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यायला मिळत आहे. अशात धोनीची हेअर स्टायलिस्टला तिची नोकरी जाण्याची भीती सतावू लागली आहे आणि त्याला कारण धोनीची कन्या झिवा आहे. 

मागली नऊ महिन्यांपासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून त्याला टीम इंडियात कमबॅक करता आले असते, परंतु आता तीही शक्यता मावळत चालली आहे. लॉकडाऊनच्या काळात कुटुंबीयांसोबत व्यग्र असलेला धोनी मुलगी झिवासोबत फुल धम्माल करत आहे. धोनीची हेअर स्टायलिस्टने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यात झिवा धोनीची हेअर स्टाईल करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करून धोनीची हेअर स्टायलिस्टने, आता माझी नोकरी धोक्यात आहे, अशी कमेंट लिहिली आहे.

पाहा व्हिडीओ...


 धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 

धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप उंचावला. 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला तो धोनीच्या नेतृत्वाखालीच आणि त्यानंतर 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरही टीम इंडियानं नाव कोरलं. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा धोनी जगातला एकमेव कर्णधार आहे. 
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

बाप रे बाप... फॉर्म्युला वनचा माजी बॉस 89 वर्षी बनला बाप; पत्नी आहे वयानं लहान

Big Breaking : कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय

Corona Virus मुळे रखडली 11 क्रिकेटपटूंची लग्न; कधी पूर्ण होणार बोहल्यावर चढण्याचं स्वप्न?

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा मनाचा मोठेपणा; पगारातून केली कोट्यवधींची मदत

Shocking : कोरोना व्हायरसमुळे खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू

Web Title: 'Think I have lost my job,' - MS Dhoni's hairstylist shares adorable video of Ziva svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.