कटक : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही भारताच्या एका खेळाडूवर अन्याय करण्यात आल्याची भावना चाहत्यांमध्ये आहे. संघात घेऊन एकही सामना आतापर्यंत या खेळाडूच्या नशिबी आलेला नाही.
भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला अजूनही आपली छाप पाडता आलेली नाही. पंतला कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. पण तरीही पंतला संघात कायम ठेवण्यात आले आहे. पण गेल्या तीन मालिकांपासून संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आलेले नाही.
ट्वेन्टी-२० विश्वचषक पाहता पंतला संधी देण्यात येत आहे. पण पंतला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ट्वेन्टी-२० मालिकेत पंत हा नापास ठरला होता. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत पंतने काही धावा केल्या, पण त्याला शतकाची संधी असूनही त्याला सोने करता आलेले नाही. त्यामुळे या सामन्यात तरी संजूला स्थान मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण या सामन्यातही संजूला संघात स्थान देण्यात आलेले नाही.
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणाला मिळाले स्थान आणि कोणाला डच्चू, जाणून घ्या...तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघात काही बदल करण्यात आले. सामन्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्यात आली.
भारताच्या संघात यावेळी फक्त एकच बदल पाहायला मिळाला. त्यामुळे रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, केदार जाधव आणि शार्दुल ठाकूर या महाराष्ट्रातील खेळाडूंनी संघात आपले स्थान कायम ठेवले आहे.दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. पण वेस्ट इंडिजने या सामन्यात मात्र कोणताही बदल केलेला नाही.
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात नवीन चेहरा, विराट कोहलीने दिली पदार्पणाची कॅपवेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात एका नव्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने या खेळाडूना पदार्पणाची कॅप दिल्याचे पाहायला मिळाले.
कटकच्या खेळपट्टीवर नवीन वेगवान गोलंदाजाला यावेळी संधी देण्याचे भारताने ठरवले आहे. त्यामुळे या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे.