पोर्ट आॅफ स्पेन : सलामीचा फलंदाज शिखर धवन सलग चार सामन्यात अपयशी ठरल्यानंतर मोठी खेळी करण्यासाठी तो नक्कीच उत्सुक असेल. त्यासोबतच भारतीय संघाला मालिका विजय मिळवण्यासाठी अखेरच्या सामन्यातील विजय आवश्यक आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला.टी २० मालिकेतील अपयशानंतर दुसºया एकदिवसीय सामन्यात शिखर धवनला फक्त दोनच धावा करता आल्या होत्या. दुखापतीनंतर त्याचे पुनरागमन फारचे चांगले राहिलेले नाही. धवनला आत येणा-या चेंडूवर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्याला दोन वेळा जलदगती गोलंदाज शेल्डन कार्टेल याने बाद केले. धवन कसोटी संघाचा भाग नाही. त्यामुळे तो आपल्या या कॅरेबियन दौ-याचा शेवट चांगला करण्यास उत्सुक असेल.भारतीय संघात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा जोरात सुरू आहे. त्यात श्रेयस अय्यर याने दुसºया सामन्यात चांगली खेळी करत रिषभ पंत याच्यावर दबाव वाढवला.पंत याला संघ व्यवस्थापनाचा आणि कर्णधार विराट कोहलीचा पाठिंबा आहे. मात्र त्याचे सततचे अपयश आणि दुसºया वनडेमध्ये अय्यर याने केलेली ६८ चेंडूत ७१ धावांची खेळी यामुळे परिस्थितीत बदल झाला. पंतची मानसिकता हा चिंतेचा विषय आहे. त्याने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आपली विकेट गमावली आहे. संघात या महत्त्वाच्या स्थानासाठी धैर्यवान फलंदाज असणे गरजेचे आहे. रविवारच्या खेळीनंतर अय्यर याने आपला दावा मजबूत केला.दुसºया वनडेत १२५ चेंडूत १२० धावा करणारा विराट कोहली आपला हा फॉर्म कायम राखण्यास उत्सुक असेल. धवन, पंत आणि रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर कोहलीने अय्यरसोबत डाव सावरला. भुवनेश्वर कुमारने गेल्या सामन्यात आठ षटकांत ३१ धावा देत चार गडी बाद केले. तो याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असेल. त्याचा सहकारी शमी याने दोन तर कुलदीप याने देखील दोन गडी बाद केले.वेस्ट इंडिजला फलंदाजांकडून अपेक्षाकुलदीप याने धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करण्याची शक्यता नाही. मात्र कोहली शमीला विश्रांती देत नवदीप सैनीला संधी देऊ शकतो.दुसरीकडे वेस्ट इंडिज्चा संघ मालिका बरोबरीत आणण्यास उत्सुक असेल. भारताला पराभूत करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अधिक जबाबदारी घेणे गरजेचे आहे. संघाकडे शाई होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पुरन यांच्यासारखे प्रतिभावान फलंदाज आहे. त्यांनी आशेनुसार खेळ करायला हवा.एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघ एंटिग्वाच्या नॉर्थ साऊंडमध्ये २२ आॅगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळतील.भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, लोकेश राहूल, मनिष पांडे, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनीवेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाई होप, शिमरोन हेटमायेर, निकोलस पुरन, रोस्टन चेस, फॅबियन अॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच
- Cricket Buzz»
- बातम्या»
- तिसरा एकदिवसीय सामना आज : मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य
तिसरा एकदिवसीय सामना आज : मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य
सलामीचा फलंदाज शिखर धवन सलग चार सामन्यात अपयशी ठरल्यानंतर मोठी खेळी करण्यासाठी तो नक्कीच उत्सुक असेल. त्यासोबतच भारतीय संघाला मालिका विजय मिळवण्यासाठी अखेरच्या सामन्यातील विजय आवश्यक आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 6:42 AM