Join us  

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा भारतीय द. आफ्रिकेविरुद्ध पराभूत; पण मालिका जिंकली

१९ वर्षांखालील क्रिकेट: भारताचा २-१ नं विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 3:29 AM

Open in App

ईस्ट लंडन : कर्णधार प्रियम गर्गच्या अर्धशतकी खेळीनंतरही भारताच्या १९ वर्षांखालील संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसºया व अखेरच्या युवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ५ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत यापूर्वीच मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. पण क्लीन स्वीप देण्याचे स्वप्न मात्र भंगले. भारताने या मालिकेत २-१ ने विजय मिळवला.भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १९२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने ४८.२ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि धावफलकावर ४२ धावांची नोंद असताना आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर गर्ग (५२) व तिलक वर्मा (२५) यांनी चौथ्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी केली. भारताने १०० धावांचा पल्ला गाठल्यानंतर गर्ग बाद झाला. त्यानंतर तळाच्या सर्वच फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या केली, पण त्यांना धावगतीला वेग देता आला नाही.द. आफ्रिकेतर्फे फेकू मोलेतसेनने ३६ धावांत २ बळी घेतले आणि दोन फलंदाज धावबाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने जोनाथन बर्डच्या १२१ चेंडूंतील ८८ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर १० चेंडू राखून विजय मिळवला. याव्यतिरिक्त सलामीवीर अँड्रयू लोऊने (३१) व जॅक लीसने (२९) चांगले योगदान दिले. भारताकडून यशस्वी जयस्वालने ४१ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)अफगाणिस्तान, झिम्बाब्वेविरुद्ध सराव सामनेभारतीय संघ जानेवारीमध्ये युवा विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहे. भारताचा ‘अ’ गटात समावेश आहे. भारत आपली सलामी लढत १९ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर २१ जानेवारीला जपान व २४ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध सामने होतील.त्याआधी, युवा भारतीय संघ अफगाणिस्तान (१२ जानेवारी) आणि झिम्बाब्वे (१४ जानेवारी) यांच्याविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.