सौरभ गांगुली लिहितात...
टीम इंडियाने पुण्यात मुसंडी मारून बरोबरी साधली. कानपूरच्या निर्णायक लढतीत विजयी लय कायम राखून विराट अॅन्ड कंपनी बाजी मारतील असा विश्वास आहे. न्यूझीलंडसारख्या लढवय्या संघावर मात करताना पुण्यात भारतीय खेळाडूंनी अष्टपैलूत्वाची झलक दिली. पुण्यातील खेळपट्टी पाटा आणि मंद होती. भुवनेश्वर आणि बुमराह यांनी सुरुवातीला धक्के देत विजयाचे अर्धेअधिक काम फत्ते केले होते. वन डे मध्ये हे दोन्ही गोलंदाज अधिक धोकादायक आहेत.
मी आधीच्या स्तंभात लिहिलेच होते की, न्यूझीलंडला सामना जिंकायचा झाल्यास गुप्तिल, केन विलियम्सन आणि रॉस टेलर या तिघांना भक्कम खेळी करावी लागेल. पण असे घडू शकले नाही. लेथम आणि टेलर यांनी पहिल्या सामन्यात जो धडाका दाखवला त्याचीही पुनरावृत्ती होऊ शकली नाही. विलियम्सन अद्यापही धावा काढण्यासाठी चाचपडत आहे पण गुप्तिलने देखील मधल्या फळीत धैर्य दाखविले नाही. पुण्यात आघाडीची फलंदाजी कोसळताच न्यूझीलंड कोंडीत सापडला. फलंदाजी ही भारतासाठी नेहमी जमेची बाजू राहिली असली तरी पुण्यात भारतीय गोलंदाज चांगलेच तळपले.
पुण्यात न्यूझीलंडने आधी फलंदाजी का घेतली, हा वादाचा विषय ठरू शकतो पण कानपूरमध्ये नाणेफेक निर्णायक ठरेल. जो
संघ नाणेफेक जिंकेल तो सुरुवातीला क्षेत्ररक्षण घेईल, अशी मला
खात्री आहे. या मैदानावर
दवबिंदूमुळे फार फरक पडतो.
ग्रीन पार्कवर खेळपट्टीसभोवतालचे २० यार्ड मैदान मंद आहे. याचा फिरकीपटूंना अधिक लाभ मिळू शकतो. यादृष्टीने कुलदीपच्या
तुलनेत अक्षर पटेलला संधी मिळू शकते. अक्षरने पुण्यातही भेदक मारा केला होता.
भारताला मालिकेत हरवायचे झाल्यास न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भुवनेश्वर आणि बुमराह यांचा मारा फोडून झकास सुरुवात करावी. याशिवाय सिनियरपैकी एखाद्याने
तरी शतकी खेळी केल्यास
भारतापुढे आव्हान उभे करता
येईल. गोलंदाजीत पाहुणा संघ चांगलाच आहे. बोल्ट आणि सॅन्टनर
हे मधल्या टप्प्यात टिच्चून मारा करतात. पण सामना जिंकण्यासाठी फलंदाजांचीही साथ मिळणे
क्रमप्राप्त ठरते. दुसरीकडे भारताने मालिका जिंकण्यासाठी कुठलाही गाफिलपणा आणि आत्मसंतुष्टी न बाळगता नेहमीसारखा खेळ करायला हवा. (गेमप्लान)
Web Title: Third one-day - tossing a green park will be the deciding factor
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.