जोहान्सबर्ग : द.आफ्रिका दौ-यात भारताचा कसोटी विजयाचा रथ रोखला गेला. टीकेचे लक्ष्य ठरलेला विराट कोहलीचा भारतीय संघ तिसºया कसोटीत वाँडरर्सवर विजय मिळवत पुनरागमन करेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. तिसरा सामना २४ जानेवारीपासून खेळला जाईल.येथील खेळपट्टी सर्वात जलद मानली जाते. याचा अर्थ क्लीन स्वीप टाळायचे झाल्यास काहीतरी करावे लागेल. निवडकर्त्यांनी नेटस्मध्ये फलंदाजी सरावासाठी दिल्लीचा नवदीप सैनी आणि मुंबईचा शार्दुल ठाकूर यांना जोहान्सबर्ग येथे पाठविले आहे.यजमानांचा रेकॉर्ड खराबयेथे यजमान संघाचा रेकॉर्ड सर्वात खराब आहे. १९५६ पासून आतापर्यंत एकूण ३७ सामने खेळविण्यात आले. यजमानांनी त्यापैकी १५ सामने जिंकले आणि ११ गमावले, अन्य ११ सामने अनिर्णीत राहिले. खेळपट्टी भारताला पूरक आहे. भारताने येथे २००६ मध्ये विजय साजरा केला होता. ही खेळपट्टी वेगवान असेल. दोन्ही संघांना समान संधी असल्याने डिव्हिलियर्सने भारतीय वेगवान माºयापासून सावध राहण्याचे संकेत दिले आहेत. माजी यष्टिरक्षक मार्क बाऊचरने वाँडरर्स भारतासाठी अनुकूल असेल, असे सांगितले. तो म्हणाला, ‘ही द.आफ्रिकेतील सर्वात जलद आणि उसळी घेणारी खेळपट्टी आहे. भारताने येथे कसोटी विजय मिळविला असल्याने त्यांचे गोलंदाज आमच्या फलंदाजांवर दडपण आणू शकतात. पण द.आफ्रिकेच्या गोलंदाजांची शारीरिक उंची लक्षात घेता, आमचे गोलंदाज भारतीय फलंदाजांच्या कानाजवळून जाणारे वेगवान चेंडू टाकू शकतात. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज हमखास गडी बाद करू शकतात. दर दिवशी येथे १० गडी बाद होण्याचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे निकाल निश्चित आहे.भारताची ‘आफ्रिकन सफारी’पहिल्या दोन्ही सामन्यात दारुण पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू जंगल सफारीवर गेले. खेळाडूंवरील दडपण कमी करण्यासाठी आम्ही सफारीचे आयोजन केले, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले. सोमवारी संघ सराव करणार आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- तिसरी कसोटी : वाँडरर्सवर पुनरागमनाची आस..., खेळपट्टी भारतासाठी पूरक
तिसरी कसोटी : वाँडरर्सवर पुनरागमनाची आस..., खेळपट्टी भारतासाठी पूरक
द.आफ्रिका दौ-यात भारताचा कसोटी विजयाचा रथ रोखला गेला. टीकेचे लक्ष्य ठरलेला विराट कोहलीचा भारतीय संघ तिस-या कसोटीत वाँडरर्सवर विजय मिळवत पुनरागमन करेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. तिसरा सामना २४ जानेवारीपासून खेळला जाईल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 1:13 AM