दोन महिन्यात दोन आंतरराष्ट्रीय संघांकडून पदार्पण; क्रिकेटपटू Michael Rippon च्या आयुष्यात 360 डिग्री कलाटणी

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या 30 वर्षीय मिचेल रिपॉन ( Michael Rippon ) याच्या आयुष्याला 360 डिग्री कलाटणी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 07:31 PM2022-06-22T19:31:04+5:302022-06-22T19:32:08+5:30

whatsapp join usJoin us
This 30-Year-Old Played for Netherlands Against New Zealand, Now His Career Takes A 360-Degree Turn | दोन महिन्यात दोन आंतरराष्ट्रीय संघांकडून पदार्पण; क्रिकेटपटू Michael Rippon च्या आयुष्यात 360 डिग्री कलाटणी

दोन महिन्यात दोन आंतरराष्ट्रीय संघांकडून पदार्पण; क्रिकेटपटू Michael Rippon च्या आयुष्यात 360 डिग्री कलाटणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या 30 वर्षीय मिचेल रिपॉन ( Michael Rippon ) याच्या आयुष्याला 360 डिग्री कलाटणी मिळाली आहे. केप टाऊनमध्ये जन्मलेला 30 वर्षीय रिपॉन हा 2013मध्ये न्युझीलंडमध्ये स्थायिक झाला. त्यानंतर तो नेदरलँड्समध्ये गेला आणि तेथे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली. पण, आता न्यूझीलंडलचा संघ नेदरलँड्स दौऱ्यावर जाणार आहे आणि रिपॉन नव्या संघातून खेळणार आहे.  
न्यूझीलंड संघाने आगामी स्कॉटलंड, आयर्लंड आणि नेदरलँड्स दौऱ्यासाठी नुकताच संघ जाहीर केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या रिपॉनने दोन महिन्यांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले, तोच आता किवींकडून खेळणार आहे. 92 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात न्यूझीलंडकडून खेळणारा रिपॉन हा पहिला डावखुरा फिरकीपटू आहे.  

मिचेल रिपॉन कोण?
 

दक्षिण आफ्रिकेहून न्यूझीलंडमध्ये आलेल्या रिपॉनने येथे ओटँगो व्होल्ट्स क्लबकडून खेळला. त्यानंतर त्याने नेदरलँड्सकडून 9 वन डे व 18 ट्वेंटी-20 सामने सामने खेळले, यात काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीचाही समावेश आहे.   

दोन संघांकडून तो कसा खेळू शकतो ?
 

आयसीसीच्या नियमानुसार ICCच्या मान्यताप्राप्त व संलग्न संघटनेकडून खेळणारा खेळाडू पूर्ण सदस्य असलेल्या संघाकडून खेळू शकतो. पण, जर तुम्ही पूर्ण सदस्य असलेल्या संघाकडून खेळणार असाल तर तुम्हाला पुन्हा मान्यताप्राप्त व संलग्न संघाकडून 3 वर्षांच्या cooling-off period पूर्वी खेळू शकत नाही.  

न्यूझीलंडचा संघ आयर्लंडविरुद्ध तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर स्टॉलडंविरुद्ध दोन ट्वेंटी-20 व 1 वन डे सामना होईल आणि त्यानंतर 4 व 6 ऑगस्टला नेदरलँड्सविरुद्ध दोन ट्वेंटी-20 सामना खेळणार आहे. ''स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर त्याला संघात स्थान मिळणं, भागच होते. डाव्या हाताने स्पिन करण्याची त्याची कला त्याला वेगळं बनवते,''असे किवीचे निवड समिती प्रमुख गेव्हिन लार्सन यांनी सांगितले.  

Web Title: This 30-Year-Old Played for Netherlands Against New Zealand, Now His Career Takes A 360-Degree Turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.