MS Dhoni Bike Collection : भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद ( Venkatesh Prasad) सोमवारी रांचीमध्ये होता आणि त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवासस्थानी हजेरी लावली. यावेळी माहीने त्याला त्याचे बाईक-कार कलेक्शन दाखवले. फार्महाऊसमध्ये बांधलेले हे मोठे गॅरेज आणि तिथे सजलेली वाहने पाहून व्यंकटेश प्रसाद चक्रावला. क्रिकेटपटू-समालोचक बनलेल्या व्यंकटेश प्रसादने देखील माहीच्या बाईक कलेक्शनचा व्हिडिओ बनवला आणि तो साक्षीने स्वतः शूट केला आहे.
प्रसाद धोनीची बाईक आणि कारची आवड पाहून थक्क झाला. मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर शेअर केलेल्या १०९ सेकंदांच्या क्लिपच्या कॅप्शनमध्ये व्यंकटेश प्रसाद लिहितात, 'मी एका व्यक्तीमध्ये पाहिलेली सर्वात विलक्षण उत्कटता. काय संग्रह आणि काय माणूस MSD. एक महान कर्तृत्ववान आणि आणखी अविश्वसनीय व्यक्ती. त्याच्या रांचीच्या घरी त्याच्या बाईक आणि कारच्या संग्रहाची ही झलक. माणूस आणि त्याची आवड पाहून भारावून गेलो.'
या व्हिडिओमध्ये प्रसादने धोनीची पत्नी साक्षीशीही संवाद साधला, तिने विचारले: 'पहिल्यांदा रांचीला आल्याबद्दल तुम्हाला कसे वाटते?' 'अप्रतिम! रांचीमध्ये माझी पहिली वेळ नाही. ही माझी चौथी वेळ आहे, पण या जागेबद्दल काय बोलावे. कोणीतरी वेडा असल्याशिवाय तुम्ही इतक्या बाईक खरेदी करू शकत नाही. हे बाईक शोरूम असू शकते. हे करण्यासाठी खूप उत्कटतेची गरज आहे.'
एका जुन्या मुलाखतीत, धोनीने सांगितले होते की त्याच्याकडे ५० पेक्षा जास्त बाईक आहेत ज्यात Harley-Davidson Fat Boy, Kawasaki Ninja H2, Ducati 1098, Yamaha RD350 आणि Suzuki Hayabusa यांचा समावेश आहे. धोनी म्हणाला होता, 'मला वाटते माझ्याकडे ५० हून अधिक बाईक्स आहेत. मला जरा वेड आहे. बाईक्स तक्रार करत नाहीत. तुम्ही त्यांना व्यवस्थित ठेवत नाही, तुम्ही त्यांना स्वच्छ करत नाही, तुम्ही त्यांना इंधन देत नाही. ती अजूनही तक्रार करत नाही आणि हेच तिचे सौंदर्य आहे. तुम्ही तिची काळजी घेतल्यास ती चांगली चालते आणि कधीही बदला घेत नाही.
व्यंकटेश प्रसाद, ज्यांनी भारतासाठी ३३ कसोटी आणि १६१ वन डे सामने खेळले आहेत, त्याने अनुक्रमे ९६ आणि १९६ विकेट्स घेतल्या आहेत.
Web Title: This is a glimpse of his collection of bikes and cars in his Ranchi house, Venkatesh Prasad films MS Dhoni's vintage bike, car collection in Ranchi house Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.