Sheldon Jackson : शेल्डन जॅक्सन हा भारतीय खेळाडू आहे की परदेशी?, तुम्हाला माहित असेल, नसेल तरी हा मजेशीर Video पाहा!

Sheldon Jackson : शेल्डन जॅक्सन हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूने असा कोणता तीर मारलाय की सोशल मीडियावर आज त्याचीच चर्चा सुरू आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 09:49 AM2022-03-23T09:49:18+5:302022-03-23T09:49:48+5:30

whatsapp join usJoin us
This is height of comedy! The cricket experts, are continuously calling Sheldon Jackson a foreign player, Watch Video  | Sheldon Jackson : शेल्डन जॅक्सन हा भारतीय खेळाडू आहे की परदेशी?, तुम्हाला माहित असेल, नसेल तरी हा मजेशीर Video पाहा!

Sheldon Jackson : शेल्डन जॅक्सन हा भारतीय खेळाडू आहे की परदेशी?, तुम्हाला माहित असेल, नसेल तरी हा मजेशीर Video पाहा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sheldon Jackson : शेल्डन जॅक्सन हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूने असा कोणता तीर मारलाय की सोशल मीडियावर आज त्याचीच चर्चा सुरू आहे. त्याच्या ट्रेंड होण्यामागे खेळाडूची कामगिरी नव्हे तर एक व्हिडीओ  कारणीभूत ठरतोय.. शेल्डन जॅक्सन हा खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022 ) कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करतो. २०१७मध्ये त्याला केवळ चार सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने ३८ धावा केल्या. KKR ने १५व्या पर्वासाठी त्याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले आहे. आता आयपीएल दोन दिवसांवर आले असताना Sheldon Jackson ट्रेंड होण्यामागचं कारण काय?

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोणत्या संघाची काय रणनीती असेल याबाबत विविध चॅनेल्स आता पॅनल डिस्कशन करत आहेत. त्यापैकी एका पॅनल डिस्कशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये पॅनलिस्ट KKR कडे परदेशी खेळाडूंमध्ये शेल्डन जॅक्सन हा सक्षम पर्याय असल्याची चर्चा करत आहे आणि ट्रेंड होण्यामागचं कारणचं हे आहे.


 

शेल्डन जॅक्सन हा नावावरून जरी परदेशी खेळाडू वाटत असला तरी तो भारयीत आहे. गुजरातच्या भावनगरमधील त्याला जन्म आणि तो स्थानिक स्पर्धांमध्ये सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ७९ सामन्यांत ५०.३९च्या सरासरीने ५९४७ धावा केल्या आहेत आणि त्यात १९ शतकं व ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६७ सामन्यांत २३४६ धावांसह ८ शतकं व १२ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. ट्वेंटी-२०तही त्याने ६२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतकही आहे. 



Web Title: This is height of comedy! The cricket experts, are continuously calling Sheldon Jackson a foreign player, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.