Join us  

BCCI vs PCB: "अशा प्रकारे व्यावसायिक संस्था महत्त्वाच्या बाबी हाताळतात", PCBचे कौतुक करताना शाहिद आफ्रिदीने BCCIला फटकारले

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 6:10 PM

Open in App

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) लांबलचक पत्र काढून टीका केली. पीसीबीने दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक करताना पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने बीसीसीआयला फटकारले आहे. 

PCBने जारी केलेल्या पत्रकात म्हटले... “पुढील वर्षी होणारी आशिया चषकाची स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवण्यासंदर्भात आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी काल केलेल्या विधानाबाबत पीसीबीने आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे. आशियाई क्रिकेट परिषद किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (यजमान) यांच्याशी चर्चा किंवा सल्लामसलत न करता आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम यांचा कोणताही विचार न करता हे विधान केले गेले आहे,''असे पीसीबीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

"पाकिस्तानला एसीसी बोर्ड सदस्यांचा जबरदस्त पाठिंबा आणि प्रतिसाद मिळाल्याने आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद दिले गेले. शाह यांचे आशिया चषक स्थलांतरित करण्याचे विधान स्पष्टपणे एकतर्फी आहे. हे तत्त्वज्ञान आणि भावनेच्या विरुद्ध आहे.  एक संयुक्त आशियाई क्रिकेट मंडळ तिच्या सदस्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि आशियातील क्रिकेट खेळाचे आयोजन, विकास आणि प्रचार करण्यासाठी सप्टेंबर 1983 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना करण्यात आली होती.''

“अशा विधानांच्या एकूण प्रभावामुळे आशियाई आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायांमध्ये फूट पडण्याची क्षमता आहे. ICC क्रिकेट विश्वचषक 2023 आणि 2024-2031 या कालावधीत भारतात होणाऱ्या ICC स्पर्धांवरही याचा परिणाम होऊ शकतो. पीसीबीला आतापर्यंत एसीसीच्या अध्यक्षांकडून कोणतेही अधिकृत पत्र किंवा स्पष्टीकरण मिळालेले नाही. त्यामुळे, PCB ने आता आशियाई क्रिकेट परिषदेला विनंती केली आहे की या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या शक्य तितक्या लवकर आपल्या बोर्डाची तातडीची बैठक बोलावली.''

शाहिद आफ्रिदीने BCCIला फटकारले पीसीबीने जारी केलेल्या पत्रकाचे कौतुक करताना शाहिद आफ्रिदीने बीसीसीआयला संवेदनशीलपणाचे धडे दिले आहेत. "पीसीबीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत. अशा प्रकारे व्यावसायिक संस्था महत्त्वाच्या बाबी हाताळतात", अशा शब्दांत आफ्रिदीने बीसीसीआयला फटकारले आहे. खरं तर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी तटस्थ ठिकाणी स्पर्धा खेळवण्याची घोषणा करताच आफ्रिदीने नाराजी व्यक्त केली होती. जय शाह यांना प्रशासकीय कारभार कळत नसल्याचा आरोप आफ्रिदीने केला. त्याने ट्विट केले की, मागील 12 महिन्यांत दोन देशांमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यांमुळे दोन्ही देशांत चांगले संबंघ निर्माण होतील, असे वातावरण निर्माण झाले होते. पण, मग टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यापूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी असं विधान का करावं? यातून भारतात  क्रिकेट प्रशासनाच्या अनुभवाचा अभाव दर्शवतो. असे शाहिद आफ्रिदीने ट्विटच्या माध्यमातून म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआयजय शाहशाहिद अफ्रिदीपाकिस्तान
Open in App