Join us  

असं आहे IPL चिअरलीडर्सच्या आयुष्याचं खरं वास्तव, केवळ डान्सच्या बळावरच नाही मिळत नोकरी!

या चीअरलिडर्सना किती पैसे मिळतात? त्यांना भारतातील मैदानांपर्यंत कोण पोहोचवतं? जाणून घेऊ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:27 PM

Open in App

देशात 2008 साली आयपीएलला सुरूवात झाली. तेव्हा चीअरलीडर्सनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. चौकार आणि षटकारांच्या वेळी डान्स करणाऱ्या या चीअरलिडर्स आयपीएलचा भाग होण्यासाठी दरवर्षी परदेशातून भारतात येतात. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या क्रिकेट प्रेमींच्या टॉन्ट्सचाही त्या बळी ठरतात. या चीअरलिडर्सना किती पैसे मिळतात? त्यांना भारतातील मैदानांपर्यंत कोण पोहोचवतं? जाणून घेऊ...

कोठून येतात या चीअरलिडर्स? -आयपीएलमध्ये दिसणाऱ्या या चीअरलीडर्स युरोपातील काही देशांमधून एजन्सीज मार्फत येतात. या मुली व्यावसायिक डान्सर आहेत. त्या विविध देशांत फिरतात आणि परफॉर्म करतात. युरोपियन देशांमध्ये चीअरलीडिंग हा एक व्यवसाय बनला आहे. या व्यवसायासाठी केवळ डान्स येणे एवढेच पुरेसे नाही. तर, परदेशात चीअरलीडर्सना फॉर्मेंशन्सदेखील करावा लागतो. यासाठी शरीराची लवचिकता असणे आवश्क आहे. यासाठी कठोर ट्रेनिंग आणि कष्ट आवश्यक आहे.

किती मिळतो पैसा? -आयपीएलमध्ये चीअरलीडर्सनाही चांगला पैसा मिळतो.  फ्रँचायझी एका हंगामासाठी त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करतात. हा कॉन्ट्रॅक्ट सुमारे 20,000 डॉलरपर्यंत असू शकतो, अर्थात भारतातील 17 लाख रुपये. याशिवाय त्यांना पार्टी परफॉर्मन्स बोनस, एलिमिनेटर बोनसही मिळतो. युरोपियन चीअरलीडर्स आणि इतर देशांतील चीअरलीडर्स यांना मिळणाऱ्या मानधनातही मोठी तफावत असते. महत्वाचे म्हणजे, डान्सरचे वय, सौंदर्य, अनुभव आणि शरीरयष्टी यानुसार, त्यांचे मानधन ठरते. चीअरलीडर्सना सामन्यापूर्वी अथवा नंतर संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये परफॉर्म करण्यासाठी अतिरिक्त पैसेही दिले जातात. मात्र, त्या जेवढी मेहनत करतात, त्या तुलनेत त्यांना कमी मानधन अथवा सॅलरी मिळते असे त्यांचे म्हणणे आहे.

प्रेक्षकांची अश्लील नजर - एका जुन्या मुलाखतीत, दिल्ली कॅपिटल्सच्या चीअरलीडर्सनी सांगितले होते की, त्यांना भारतात सेलिब्रिटींसारखे वाटते. लोक त्यांच्यासोबत सेल्फीही काढतात. मात्र, काही लोक वातावरण खराब करतात. आम्ही पोडिअमवर डान्स करतो, तेव्हा आमच्याकडे भोगविलासाचे सामान म्हणून पाहिले जाते. चीअरलीडिंग हा आमचा व्यवसाय आहे. लोक आमच्यावर वाईट कमेंट करतात, अश्लील हावभाव करतात. याचा सामनाही आम्हाला करावा लागतो.

टॅग्स :आयपीएल २०२३इंडियन प्रीमिअर लीग
Open in App