Sri Lanka vs Afghanistan Test ( Marathi News ) : मैदानावर श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस अनुभवी अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजची ( Angelo Mathews ) शानदार खेळी दुर्दैवी रीतीने संपुष्टात आली. त्याने २५९ चेंडूंत शानदार १४१ धावा चोपल्या. अँजेलो मॅथ्यूजच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ४३९ धावांचा डोंगर उभा केला. अफगाणिस्तानला पहिल्या डावात १९८ धावाच करता आल्या आणि श्रीलंकेने २४१ धावांची मजबूत आघाडी घेतली.
अनुभवी अष्टपैलू कुसल मेंडिस बाद धाल्यानंतर दिमुथ करुणारत्नेसह डाव स्थिर केला आणि नंतर मॅथ्यूज व दिनेश चंडिमल ( १०७) यांनी दोनशेहून अधिक धावांची जबरदस्त भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी शतके झळकावली. मॅथ्यूजचे शतक हे कसोटी क्रिकेटमधील त्याचे १६ वे आणि घरच्या मैदानावरील सातवे शतक ठरले. मात्र, मॅथ्यूजची खेळी ज्या पद्धतीने संपुष्टात आली, हे त्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. अफगाण गोलंदाज
कैस अहमदचा सामना करताना, मॅथ्यूजने लेग साइडला जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला.
चेंडूवर फटका चांगला बसला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून चेंडू चौकारही गेला, परंतु मॅथ्यूजची बॅट यष्टींवर आदळली आणि त्याला हिट विकेट आऊट व्हावे लागले. त्याने २५९ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १४१ धावा केल्या.
या खेळीसह मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटमध्ये ७५०० धावांचा टप्पा ओलांडला. त्याच्या नावावर १६ शतके आणि ४० अर्धशतक आहेत. तो कसोटीत श्रीलंकेसाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
Web Title: This must be the worst wicket-taking ball in Test cricket history, Angelo Mathews Gets Hit-Wicket Out Vs AFG, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.