Join us  

ठरलं तर मग! रोहित शर्मा Mumbai Indians कडून खेळणार की दुसऱ्या फ्रँचायझीकडून?

IPL 2024 Trade Window : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians Captain) हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 9:16 AM

Open in App

IPL 2024 Trade Window  ( Marathi News ) : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians Captain) हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली MI ने पाच जेतेपदं पटकावली आणि आता तोच रोहित आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहितच्या व मुंबई इंडियन्सच्याही फॅन्सना फ्रँचायझीचा हा निर्णय काही पटलेला नाही. रोहितचा अपमान केल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसली आहे आणि त्याने आता अन्य फ्रँचायझीकडून खेळावे अशीही अनेकांची इच्छा आहे. आता रोहित IPL 2024 मध्ये कोणत्या फ्रँचायझीकडून खेळणार हे ठरलं आहे. 

Breaking : IPL 2024 Schedule जाहीर, CSK vs RCB पहिली मॅच; आता फक्त १७ दिवसांचे वेळापत्रक

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० अशी पाच जेतेपदं पटकावली. चेन्नई सुपर किंग्सने मागच्या वर्षी आयपीएल जिंकण्यापूर्वी MI हा सर्वाधिक ५ जेतेपदं जिंकणारा संघ होता. रोहितने आयपीएलमध्ये १५८ सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी ८७ सामने जिंकले. ६७ सामन्यांत मुंबईची हार झाली, तर ४ सामने टाय राहिले. रोहितने आयपीएलमध्ये एकूण २४३ सामन्यांत २९.५८च्या सरासरीने ६२११ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ५५४ चौकार व २५७ षटकार खेचले आहेत.

रोहित दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळणार?आयपीएल २०२४ च्या पहिल्या २१ सामन्यांचं वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले गेले. लोकसभा निवडणुकींच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्याने BCCI ने पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर केले आहे. या घोषणेने रोहित मुंबई इंडियन्सकडेच राहणार असल्याचेही स्पष्ट झाले. वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी ट्रेडिंग विंडो खुली होती. तोपर्यंत रोहित दुसऱ्या फ्रँचायझीकडे जाऊ शकत होता आता ट्रेडिंग विंडो बंद झाली आहे.

मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सरोहित शर्माहार्दिक पांड्या