कुटुंबाच्या चिंतेमुळे ‘त्या’ खेळाडूंचा इंग्लंड दौऱ्यास नकार

तिघेही तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी करारबद्ध आहेत. बोर्ड त्यांच्या भावना समजू शकते आणि त्यांच्यासोबत आमची सहानुभूती असल्याचे सीडब्ल्यूआयचे सीईओ जॉनी ग्रेव्ह असल्याचे सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:05 AM2020-06-06T05:05:11+5:302020-06-06T05:05:20+5:30

whatsapp join usJoin us
'Those' players refuse to tour England due to family concerns | कुटुंबाच्या चिंतेमुळे ‘त्या’ खेळाडूंचा इंग्लंड दौऱ्यास नकार

कुटुंबाच्या चिंतेमुळे ‘त्या’ खेळाडूंचा इंग्लंड दौऱ्यास नकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

किंग्स्टन : डेरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर आणि कीमो पॉल या तीन खेळाडूंनी कौटुंबिक चिंतेमुळे कोरोना महामारीत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौरा करण्यास नकार दिला, असे क्रिकेट वेस्ट इंडिजने शुक्रवारी स्पष्ट केले.


तिघेही तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी करारबद्ध आहेत. बोर्ड त्यांच्या भावना समजू शकते आणि त्यांच्यासोबत आमची सहानुभूती असल्याचे सीडब्ल्यूआयचे सीईओ जॉनी ग्रेव्ह असल्याचे सांगितले.


ईएसपीएनक्रिकइन्फोला ही माहिती देताना गे्रव्ह म्हणाले, ‘कीमो पॉल हा संपूर्ण मोठ्या कुटुंबाचा एकमेव कर्ता पुरुष आहे. तो खरोखर फार चिंताग्रस्त होता. मला काही झाले तर कुटुंबाचे काय होईल, अशी त्याची चिंता आहे.’ पॉलने बोर्डाला ई मेल पाठवून दौºयातून वगळण्याची विनंती केली होती.’


‘विंडीजसाठी खेळणे किती महत्त्वपूर्ण असून या दौºयातून माघार घेणे किमोसाठी फार कठीण निर्णय होता. कुटुंबासोबत चर्चा केल्यानंतर त्यांना सोडून विदेशात जाणे मनाला पटण्यासारखे नव्हते. कोरोनाच्या कठीण काळात कुटुंबापासून दूर जाऊ इच्छित नाही,’ असे कीमोने ईमेलमध्ये म्हटले होते.


ब्राव्हो ह देखील कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे चिंताग्रस्त आहे. इंग्लंडमध्ये २.७० लाख कोरोनाबाधित लोक पाहून मी आपल्या कुटुंबापासून दूर जाऊ शकत नाही, असे ब्राव्होचे मत आहे. ग्रेव्ह म्हणाले, ‘ब्राव्हो यानेदेखील मोठ्या विचाराअंती निर्णय घेतला. त्याच्यासाठी वेस्ट इंडिजसाठी खेळणे सन्मानजनक आहे.’
८ जुलैपासून सुरू होणाºया तीन सामन्यांच्या मालिकेसाठी २५ सदस्यांचा विंडीज संघ मंगळवारी इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. (वृत्तसंस्था)

जैव सुरक्षेमुळे संभाव्य धोका टळेल - ईसीबी
च्लंडन : विंडीजविरुद्धची कसोटी मालिका जैव सुरक्षित वातावरणात खेळली जाणार असल्याने कुठलाही संभाव्य धोका टाळता येईल, असा विश्वास ईसीबीचे संचालक स्टीव्ह एलवर्दी यांनी व्यक्त केला. ही मालिका ८ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यासाठी २५ सदस्यांचा विंडीज संघ मंगळवारी चार्टर्ड विमानाने इंग्लंडमध्ये दाखल होईल. ‘सर्वात वाईट अवस्थेतदेखील खेळाडूंच्या आरोग्याला इजा पोहोचणार नाही, अशी आम्ही व्यवस्था केली आहे. पाहुणा संघ तीन आठवडे ओल्ड ट्रॅफोर्ड येथे विलगीकरणात राहील. एखादा खेळाडू कोरोनाबाधित आढळल्यास त्याचा पर्याय उपलब्ध करण्यास आयसीसी परवानगी देण्याच्या विचारात आहे,’ असे एलवर्दी यांनी सांगितले.

Web Title: 'Those' players refuse to tour England due to family concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.