भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव Indian Premier League ( IPL 2020) मधून माघार घेतली. त्याच्या नातेवाईकांवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. त्या हल्ल्यात रैनाच्या काकांसह आत्ये भावाचं मृत्यू झाला. पंजाब पोलिसांना या हत्येचा उलगडा लावण्यात यश आलं असून त्यांनी या प्रकरणी तिघांना अटक केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) क्रिकेटपटू रैनानं पोलिसांचे आभार मानले आहेत.
विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? माजी खेळाडूनं सांगितलं 'या' खेळाडूचं नाव
बुधवारी रैनानं पंजाब येथील थरियर गावात आत्येच्या घरी भेट दिली. त्याच्या आत्येची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास केला आणि 100हून अधिक जणांची चौकशी केली. रैनानं या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंजाब पोलिसांकडे मदत मागितली होती. अमरींदर सिंग यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याचे आदेश दिले होती. त्यांनी ट्विट केलं होतं की,''सुरेश रैना यांच्या नातेवाईकांवर झालेल्या हल्ल्याबाबत सहानुभूती व्यक्त करतो. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकानं करण्याचे आदेश मी दिले आहेत आणि पंजाब पोलिसांना दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यासही सांगितले आहे.''
त्या रात्री नेमकं काय घडलं?19 ऑगस्टला रैनाचे नातेवाईक घराच्या टेरेसवर झोपले असताना मध्यरात्री त्यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. रैनाच्या काकांचे पठाणकोट येथील थरीयाल गावात झालेल्या हल्ल्यात निधन झाले असून आत्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे रैना मायदेशात परतला. रैनाच्या वडीलांची बहिण आशा देवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे त्याचे 58 वर्षीय काका अशोक कुमार यांचे निधन झाले. रैनाचे आत्ये भाऊ कौशल कुमार ( 32 वर्ष) आणि अपीन कुमार ( 24 वर्ष) यांनाही दुखापत झाली आहे. चोरीच्या उद्देशानं हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.
रैनानं मानले आभार''आज सकाळी मी या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्या कामाचे कौतुक. आम्ही गमावलेली व्यक्ती परत येणार नाही, परंतु या आरोपिंकडून होणारे पुढील कृत्यांना नक्की आळा बसेल. पंजाब पोलीस आणि पंजाबचे मुख्यमंत्र्यांचे आभार,''असे रैनानं ट्विट केलं.