Join us

श्रीलंकेचे तीन क्रिकेटपटू निलंबित, मायदेशी परतण्याचे आदेश

इंग्लंड दौरा; तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 07:35 IST

Open in App
ठळक मुद्देसलामीवीर धनुष्का गुणतिलका याचाही निलंबित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर डऱ्हॅमच्या रस्त्यावर धनुष्का फिरताना दिसला.

कोलंबो : इंग्लंडच्या सध्या सुरू असलेल्या दौऱ्यादरम्यान बायो-बबल(जैव सुरक्षा वातावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीलंकेच्या तीन क्रिकेटपटूंना निलंबित करण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी)ही माहिती दिली असून, या तीन क्रिकेटपटूंमध्ये फलंदाज कुसाल मेंडिस आणि निरोशन डिकवेला या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. या तिन्ही क्रिकेटपटूंना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सलामीवीर धनुष्का गुणतिलका याचाही निलंबित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर डऱ्हॅमच्या रस्त्यावर धनुष्का फिरताना दिसला. या तिन्ही खेळाडूंचा या सामन्यात सहभाग होता. एसएलसीचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी सांगितले की, ‘श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने कुसाल मेंडिस, धनुष्का गुणतिलका आणि निरोशन डिकवेला यांना बायो-बबल नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :श्रीलंकाइंग्लंड