कोरोना व्हायरसच्या संकटात हळुहळू क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 8 जुलैपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पण, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर येण्यास विंडीजच्या तीन खेळाडूंनी नकार दिला असल्याचे वृत्त 'डेली मेल'नं प्रसिद्ध केलं आहे. त्यात वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं बुधवारी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली. सोबत 11 राखीव खेळाडूंचीही नावं जाहीर करण्यात आली आहेत.
मार्च महिन्यापासून सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. पण, आता इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 8, 16 आणि 24 जुलैला क्रिकेट सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी विंडीजनं 14 सदस्यीय संघ जाहीर केला. डॅरेन ब्राव्हो, किमो पॉल आणि शिमरोन हेटमायर यांनी इंग्लंड दौऱ्यावर येण्यास नकार दिल्याचे विंडीज बोर्डानं सांगितले. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखील विंडीज संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
संघ - जेसन होल्डर ( कर्णधार), जेर्मेन ब्लॅकवूड, एन. बोनर, क्रेग ब्रॅथवेट, एस ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, रहकीम डॉवरीच, चेमार होल्डर, शे होप, अल्झारी जोसेफ, रेयमन रेईफर, केमार रोच.
निर्दयी मनुष्य; गर्भवती हत्तीची निर्घृण हत्या; भुकेनं व्याकुळ भटकत होती
17 वर्षीय नसीम शाह टीम इंडियाच्या विराट कोहलीला सहज बाद करेल; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा दावा
वाईट बातमी: नऊ वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूनं घेतला अखेरचा श्वास
'त्या' प्रसंगामुळे प्रचंड वेदना झाल्या होत्या; हार्दिक पांड्यानं व्यक्त केली खंत
'अलग प्रकार का आदमी है!' हार्दिक-नताशाच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा
वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघातील खेळाडू भडकला; दिली अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्याची धमकी