वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे आणि सोमवारपासून ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. कराची येथील नॅशनल स्टेडियमवर तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघानं नुकतंच बांगलादेश दौऱ्यावर ३-० अशा फरकानं ट्वेंटी-२० मालिका जिंकली. कसोटी मालिकेतही त्यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले.
नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, परंतु ऑस्ट्रेलियानं त्यांची घोडदौड रोखली. त्यानंतर त्यांनी बांगलादेश दौरा गाजवला अन् आता घरच्या मैदानावर खेळण्यासाठी ते सज्ज झाले आहेत, परंतु चाहत्यांमध्ये फार रस उरलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ट्वेंटी-२० सामन्यासाठी २५० ते २००० रुपयांचे तिकिट, तर वन डे मालिकेसाठी १०० ते १००० रुपयांपर्यंत तिकिट ठेवले आहे. पण, अद्याप त्यापैकी मोजकीच तिकिटं विकली गेली आहेत.
तेथील काही स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार ५०० रुपयांचेच तिकिटं विकली गेली आहेत. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांना या मालिकेसाठी आपापले संघ जाहीर केले आहेत. ही मालिका कडक बंदोबस्तात होणार आहे. ( Pakistan vs West Indies Series Security Plan) या मलिकेसाठी ८८९ कमांडो, ३८२२ कॉन्स्टेबल व हेड कॉन्स्टेबल, ५०० RRF फायटर्स, ४६ डिएसपी, ३१५ NGO आणि ५० महिला पोलीस अशी सुरक्षायंत्रणा सज्ज ठेवली गेली आहे.
पाकिस्तानचा संघ - बाबार आजम, शादाब खान, आसिफ अली, फाखर जमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिकार अहमद, इमाम-उल-हक, खुशदीप शाह, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम ज्यु., मोहम्मद हस्नैन, उस्मान कादीर, सौद शकिल, शाहिन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी.
वेस्ट इंडिजचा संघ - शाय होप, डॅरेन ब्राव्हा. शमारह ब्रूक्स, रोस्टन चेस, जस्टीन ग्रीव्हस, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, गुडकेश मोटीए, अँडरसन फिलिप, निकोलस पुरन, रेयमन रैफर, रोमारियो शेफर्ड, ओडीन स्मिथ, हेडन वॉल्श ज्यु.
ट्वेटी-20 मालिका - 13, 16 व 18 डिसेंबर ( वेळ - सायंकाळी 6.30 वाजल्यापासून)
वन डे मालिका - 18, 20 व 22 डिसेंबर ( वेळ - दुपारी 1.30 वाजल्यापासून)