वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात तिलक वर्माने ( Tilak Varma) पदार्पण केले . तिलकने पदार्पणाच्या सामन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन षटकार मारून दमदार सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने २२ चेंडूत ३९ धावा केल्या. सामन्यानंतर तिलकला ११६०० किमीवरून एक व्हिडीओ कॉल आला आणि तो भारतातून नव्हता, तर दक्षिण आफ्रिकेतून होता. मुंबई इंडियन्सचा सहकारी आणि दक्षिण आफ्रिकेचा 'बेबी AB' डेवॉल्ड ब्रेव्हिसने हा कॉल केला होता. पदार्पणाच्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान तिलकने सर्वोत्तम झेल पकडला. त्याचवेळी फलंदाजीत त्याने २२ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने रोमॅरियो शेफर्डच्या गोलंदाजीवर त्याचा सर्वोत्तम झेल घेतला. त्यानंतर टीम इंडियाच्या विकेट्स सतत पडत राहिल्या आणि ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
सामना संपल्यानंतर तिलकला दक्षिण आफ्रिकेतून फोन आला. डेवॉल्ड ब्रेव्हिस हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो आणि त्याने तिलकचे अभिनंदन करण्यासाठी हा कॉल केला होता. ब्रेव्हिसचा कॉल पाहून तिलकला खूप आनंद झाला आणि त्याला कुटुंबातील कोणीतरी फोन करेल असे वाटले. पण,ब्रेव्हिसला पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. तिलकाने ब्रेव्हिसला आपला भाऊ म्हटले आणि त्याचे आभारही मानले. कॉल दरम्यान दोन्ही खेळाडू खूप आनंदी दिसत होते.
तिलकनेही त्या बदल्यात कृतज्ञता व्यक्त केली. त्याने म्हटले की तो त्याच्या प्रशिक्षक आणि कुटुंबाकडून कॉलची अपेक्षा करत होता, परंतु त्याच्या मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्याने त्याला आश्चर्यचकित केले. “मी विचार करत होतो की हा कॉल माझा प्रशिक्षक किंवा माझ्या कुटुंबातून असू शकतो, परंतु तो माझा भाऊ डेवाल्ड ब्रेव्हिस होता. खूप खूप धन्यवाद, भाऊ. मी तुमच्या संदेशाची खरोखर प्रशंसा करतो. लवकरच भेटू, आणि खूप खूप धन्यवाद,” असे तिलक म्हणाला.