Join us

Asian Games: तिलक वर्माची 'मॅचविनिंग' खेळी; विजयानंतर दाखवला अंगावरचा टॅटू, काय आहे खास? (Video)

तिलक वर्माने मारले ६ षटकार, ठोकलं नाबाद शतक, खेळी खास व्यक्तीला केली समर्पित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 13:15 IST

Open in App

Tilak Varma Celebration, Asian Games 2023 India vs Bangladesh Semifinal: आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक वर्षांनी क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद भारताला मिळाले. आता भारतीय पुरूष संघानेही स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आणखी एक पदक पक्के केले. भारताने बांगलादेशच्या संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव केला. बांगलादेशने पहिले फलंदाजी करताना २० षटकांत ९६ धावा केल्या होत्या. भारताने ९७ धावांचे आव्हान ९ गडी राखून ९.२ षटकांमध्ये पूर्ण केले. यात तिलक वर्माने नाबाद अर्धशतक ठोकले. या विजयानंतर त्याने अंगावरचा टॅटू दाखवत खेळी एका खास व्यक्तीला समर्पित केली.

९७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा या दोघांनी संघाला विजय मिळवून दिला. ऋतुराज गायकवाडने नाबाद ४० धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तर तिलक वर्माने मॅचविनिंग खेळी केली. त्याने २६ चेंडूत ६ षटकार आणि २ चौकारांच्या साथीने नाबाद ५५ धावा केल्या. या विजयानंतर तिलक वर्माने आपल्या शरीरावर काढलेला पालकांचा टॅटू दाखवला, त्यांना नमस्कारही केला. सामन्यानंतरच्या मुलाखतीत त्याने, आपली खेळी आईला समर्पित केल्याचेही सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून त्याचा कठीण काळ सुरू होता. त्यावेळी आईने त्याला लढा देण्याची प्रेरण दिली आणि त्यामुळेच त्याने दमदार कामगिरी केली, असे तिलक वर्मा म्हणाले.

दरम्यान, त्याआधी भारता विरूद्ध बांगलादेशने उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण त्यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. बांगलादेशकडून जाकर अलीने २९ चेंडूत सर्वाधिक नाबाद २४ धावा केल्या, तर परवेझ एमॉनने ३२ चेंडूत २३ धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने कशीबशी २० षटकांत ९ बाद ९६ धावांची खेळी केली होती. भारताकडून आर साई किशोरने सर्वाधिक ३ बळी घेतले.

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३भारतबांगलादेशतिलक वर्मा