Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कोलकाता विरूद्ध सुरुवातीच्या टप्प्यात अप्रतिम गोलंदाजी केली. नुवान तुषाराला आजच्या सामन्यात सूर गवसला. त्याने पहिल्या दोन षटकांतच ३ गडी माघारी धाडले. त्याच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावरच कोलकाता पॉवरप्ले मध्ये ४ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ५७ धावा करू शकली. पहिल्याच षटकात नुवान तुषाराने फॉर्मात असेलल्या फिल सॉल्टला बाद केले. सॉल्टचा कॅच मात्र चर्चेचा विषय ठरला.
फिल सॉल्टने नेहमीप्रमाणे वेगवान सुरुवात करण्याचा विचार केला होता. त्यामुळेच सलामीला आल्यानंतर पहिल्याच षटकात त्याने एक चौकार लगावला. त्यानंतर त्याने षटकाच्या पाचव्या चेंडुवर हवेत फटका मारला. त्याचा फटका सीमारेषेच्या दिशेने जात असताना दोन फिल्डर्स कॅच घेण्यासाठी धावले. एकीकडून तिलक वर्मा धावला तर दुसरीकडून नमन धीर धावत आला. वानखेडेवरील गर्दीच्या आवाजात दोघांचाही गोंधळ झाला. त्यामुळे तिलक वर्माने झेल टिपला पण त्यानंतर ते दोघे एकमेकांवर आदळले. पण असे असले तरी तिलकने हातून चेंडू सुटू दिला नाही. त्यामुळे त्याने सुपर कॅच घेतल सॉल्टला माघारी धाडले.
फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या षटकात तुषाराने कोलकाता दोन धक्के दिले. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूवर अंगक्रिश रघुवंशीला बाद केले. अंगक्रिशने १३ धावा केल्या. त्यानंतर त्याच षटकात शेवटच्या चेंडूवर त्याने श्रेयस अय्यरलाही झेलबाद करवले. अय्यर केवळ ६ धावा करू शकला. तुषारानंतर पाचव्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याने सुनील नारायणचा ५ धावांवर त्रिफळा उडवला. तर पियुष चावलाने डावाच्या सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिंकू सिंगला ९ धावांवर स्वयंझेल घेत बाद केले.
सुमार दर्जाच्या फलंदाजीमुळे कोलकाताचा अर्धा संघ ५७ धावांतच बाद झाला होता. पण त्यानंतर वेंकटेश अय्यरचे अर्धशतक आणि मनिष पांडेची त्याला लाभलेली साथ यामुळे कोलकाता दीडशेपार मजल मारली.
Web Title: Tilak Varma takes superb catch confusion after collide with fielder on Nuwan Thushara Bowling to dismiss Phil Salt
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.