Dwayne Bravo Wicket Tilak Verma Video, IPL 2022 MI vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज संघाची फलंदाजी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीपुढे अक्षरश: ढेपाळली. मुंबईकर गोलंदाजांनी CSK ला शंभरीही गाठून दिली नाही. डॅनियल सॅम्सचे तीन बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या बळावर मुंबईने चेन्नईला ९७ धावांत माघारी धाडले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाबाद ३६ धावा करत संघाला थोडीशी आशा दिली होती. पण अखेर CSK ला शंभरीही गाठता आली नाही. डावात ड्वेन ब्राव्होचा झेल सर्वोत्तम ठरला.
महेंद्रसिंग धोनी आणि ड्वेन ब्राव्हो ही फलंदाजांची शेवटची जोडी मैदानावर होती. ब्राव्होला गोलंदाजी करण्यासाठी कुमार कार्तिकेय आला. त्याच्या स्पिन गोलंदाजीवर ब्राव्होने पहिल्या चेंडूवर षटकार मारला. त्यामुळे हे षटक खूप धावांसाठी जाणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण दुसऱ्याच चेंडूवर फुलटॉस खेळताना ब्राव्होने चेंडू मारला आणि तिलक वर्माने अगदी जवळ उभं राहून त्याचा झेल पकडला. पाहा व्हिडीओ-
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेन ब्राव्हो, महेश तिक्षणा, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, रमणदीप सिंग, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, रायली मेरेडिथ