India Vs Pakistan T20 Live: "आता इतर फलंदाजांना पुढे येण्याची वेळ आली आहे", बाबर-रिझवान बाद होताच शाहिद आफ्रिदीने दिला सल्ला 

IND Vs PAK Live T20 Scoreboard: सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 02:06 PM2022-10-23T14:06:01+5:302022-10-23T14:07:31+5:30

whatsapp join usJoin us
Time for other batters to step up says shahid afridi after babar azam and mohammad rizvan out early  | India Vs Pakistan T20 Live: "आता इतर फलंदाजांना पुढे येण्याची वेळ आली आहे", बाबर-रिझवान बाद होताच शाहिद आफ्रिदीने दिला सल्ला 

India Vs Pakistan T20 Live: "आता इतर फलंदाजांना पुढे येण्याची वेळ आली आहे", बाबर-रिझवान बाद होताच शाहिद आफ्रिदीने दिला सल्ला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना खेळवला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) डावाच्या दुसऱ्याच षटकांत बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एलबीडब्ल्यू करून बाहेरचा रस्ता दाखवला. पाकिस्तानी संघाची मिडिल ऑर्डर सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवले असतानाच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. सध्या ६.२ षटकांपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या २ बाद ३५ अशी आहे. 

दोन्हीही सलामीवीर बाद झाले असताना आता इतर खेळाडूंनी पुढे यायला हवं असे आफ्रिदीने म्हटले आहे. "गुडलक पाकिस्तान! इतर फलंदाजांना पुढे जाण्याची वेळ आली आहे, पूरग्रस्तांसाठी आमच्या प्रकल्पांची स्थिती पाहण्यासाठी मी बलुचिस्तानला जात असताना मी खेळावर बारीक लक्ष ठेवून आहे", अशा आशयाचे ट्विट आफ्रिदीने केले आहे. आपला पहिलाच टी-२० विश्वचषक अर्शदीपने डावाच्या चौथ्या आणि त्याच्या दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रिझवानला झेलबाद केले. भुवनेश्वर कुमारने रिझवानचा शानदार झेल घेऊन पाकिस्तानला दुसरा झटका दिला. 

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज ७ फलंदाज, एक अष्टपैलू व तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरत असल्याचे रोहितने सांगितले. पण, प्रत्यक्ष संघ पाहिल्यास पाच फलंदाज, १ अष्टपैलू, २ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज संघात दिसत आहेत. रोहितने आज मैदानावर पाऊल ठेवताच मोठा विक्रम नावावर केला. ८ टी-२० वर्ल्ड कप खेळणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. रोहितने २००७ ते २०२२ मध्ये खेळलेल्या ८ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ३४ सामन्यांत ३८.५०च्या सरासरीने  ८४७ धावा केल्या आहेत. त्यात ८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद ७९ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, हैदर अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ, 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: Time for other batters to step up says shahid afridi after babar azam and mohammad rizvan out early 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.