'The time has come': West Indies superstar Dwayne Bravo confirms retirement : वेस्ट इंडिजचा सुपरस्टार ड्वेन ब्राव्हो यानं गुरुवारी अखेर निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडिजला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी श्रीलंकेकडून २० धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर ब्राव्होनं ६ नोव्हेंबरला ग्रुप १ मधील अखेरचा साखळी सामना ( वि. ऑस्ट्रेलिया ) हा निरोपाचा सामना असेल असे जाहीर केले.
तो म्हणाला, मला वाटतं की ती वेळ आलीय. माझी क्रिकेट कारकीर्द समाधानकारक राहिली. १८ वर्ष मी वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केलं आणि या प्रवासात चढ-उतारही आले, परंतु मागे वळून पाहताना मी स्वतःला भाग्यवंत समजतो. आयसीसीच्या तीन स्पर्धा मी जिंकलो, त्यापैकी दोन या डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली जिंकलो. आम्ही ज्या Era मध्ये खेळलो त्यात जागतिक क्रिकेटमध्ये आम्ही स्वतःचे नाव गाजवू शकलो, याचा मला अभिमान आहे.
दोन वेळा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राव्होनं ९० ट्वेंटी-२० सामन्यांत ७८ विकेट्स आणि १००० हून अधिका धावा केल्या आहेत. २००४मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि एकूण २९३ सामने खेळला. शनिवारी तो विंडीजकडून २९४वा सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तो सामना त्याच्या कारकिर्दीचा निरोपाचा सामना आहे. २०१२मध्ये वेस्ट इंडिनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा ब्राव्होनं विजयी झेल टीपला होता. २०१६च्या विजयातही त्याचा सिंहाचा वाटा होता.
''आता मी माझा अनुभव युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी वापरणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे भवितव्य उज्ज्वल आहे. त्यांना पाठींबा देत राहणे व प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. या वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरीची आम्हाला अपेक्षा नव्हती, ''असेही तो म्हणाला.
Web Title: 'The time has come': West Indies superstar confirms retirement: Dwayne Bravo has confirmed he will retire at the end of the T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.