मुंबई : भारताच्या संघाने एकदा तर दसऱ्याच्याच रात्री दिवाळी साजरी केली होती. ही गोष्ट आहे 22 वर्षे पूर्वीची. साल 1996. 21 ऑक्टोबर 1996, या दिवशी दसरा होता. ठिकाण होतं बंगळुरु. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टायटन चषक स्पर्धा खेळवली जात होती. या स्पर्धेच्या साखळी सामन्यांमध्ये ही गोष्ट पाहायला मिळाली होती. पण त्यावेळी नेमके घडले तरी काय होते...
हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियाचे त्यावेळी कर्णधार होते मार्क टेलर. यावेळी भारताचा कर्णधार होता माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या जवागल श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद यांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम केले. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी कर्णधार टेलर यांनी 105 धावांची खेळी साकारली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या अन्य कोणत्याही खेळाडूला 40 धावांचा आकडाही पार करता आला नव्हता. टेलर यांच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत7 बाद 215 अशी धावसंख्या उभारली.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण सचिन तेंडुलकरने 88 धावांची खेळी साकारत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. सचिन जेव्हा आऊट झाला तेव्हा भारताची 8 बाद 164 अशी अवस्था होती. ऑस्ट्रेलिया आता दोन विकेट्स मिळवून सामना जिंकणार, असे वाटत होते. पण भारताच्या श्रीनाथने 23 चेंडूंमध्ये 30 आणि अनिल कुंबळेने 16 चेंडूंत 16 धावांची नाबाद खेळी साकारत विजय साजरा केला होता.
Web Title: ... at that time the Indian team had celebrated Diwali on the night of Dussehra
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.